‘गॉन विथ द विंड’ हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट आज ८१ वर्षानंतरही तितकाच लोकप्रिय आहे. या चित्रपटाने तब्बल आठ ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरले होते. यावरुन ‘गॉन विथ द विंड’च्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मात्र मैलांचा दगड म्हणून गौरवला जाणारा हा चित्रपट वर्णद्वेषाला पाठिंबा देतोय अशी टीका केली जात आहे. परिणामी HBO मॅक्सने या क्लासिक चित्रपटाला आपल्या संग्रहातून काढून टाकलं आहे.

हा व्हिडीओ पाहाच – “अमित शाहांना धड खोटंही बोलता येत नाही”; त्या व्हिडीओवरुन अभिनेत्याचा टोला

अवश्य पाहा – सलमानने कतरिनाला घातली होती लग्नाची मागणी; व्हिडीओ होतोय व्हायरल

HBO मॅक्सच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्णद्वेषाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी ‘गॉन विथ द विंड’ हा चित्रपट संहग्रातून काढून टाकला आहे. “या चित्रपटात कृष्णवर्णीयांवर टीका करण्यात आली आहे. अनेक दृष्यांमध्ये रंगावरुन त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. त्याकाळी या गोष्टी कदाचित सामान्य असतील त्यामुळे ही दृश्य कापली गेली नाहीत. परंतु अशा प्रकारे कोणाचीही खिल्ली उडवणं तेव्हाही चुकचं होतं आणि आजही चुकीचच आहे. जर आपल्याला समाजात सुरु असलेल्या चुकीच्या रुढी परंपरांना बंद करायचं असेल तर आंदोलनाची सुरुवात आपल्या साहित्यापासूनच करावी लागेल. त्यामुळे HBO मॅक्सने ‘गॉन विथ द विंड’ चित्रपटाला संग्रहातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.” अशा प्रकारचं स्पष्टीकरण HBO मॅक्सच्या प्रवक्त्यांनी दिलं.

हा चित्रपट मार्गारेट मिचेल यांच्या ‘गॉन विथ द विंड’ या कादंबरीवर आधारित आहे. १९३६ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी त्या काळी खूपच चर्चेत होती. त्यामुळेच या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली गेली. हा चित्रपट जवळपास चार तास इतका मोठा आहे. या चित्रपटाच्या निर्मितीवर ३. ८५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतका खर्च करण्यात आला होता. त्याकाळचा हा सर्वाधिक महागडा चित्रपट होता. लक्षवेधी बाब म्हणजे ‘गॉन विथ द विंड’ने ३९० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कमाई केली होती.