13 August 2020

News Flash

“तुला मजुरांचं दु:ख दिसत नाही का?”; सारा अली खानवर अभिनेता संतापला

अमेरिकेतील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सारावर अभिनेत्याची टीका

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी ती अमेरिकेत सुरु असलेल्या वर्णभेदी चळवळीमुळे चर्चेत आहे. इतर बॉलिवूड कलाकारांसोबत साराने देखील ‘ब्लॅक लिव्ह मॅटर’ या चळवळीला पाठिंबा दिला. परंतु यावरुन अभिनेता कमाल खानने तिच्यावर जोरदार टीका केली. “साराला अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे दु:ख दिसले पण देशातील मजुरांचे नाही.” असं म्हणत त्याने संताप व्यक्त केला आहे.

“फटाक्यांनी भरलेलं फळ खाल्यामुळे गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. तसेच अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांमुळे मृत्यू झाला. या दोन दुदैवी घटनांमुळे सारा अली खान दु:खी झाली आहे. ती दिवसरात्र रडत आहे. परंतु तिला देशातील मजुरांचं दु:ख दिसलं नाही का? करोनामुळे बेरोजगार झालेल्या त्या भारतीय मजुरांसाठी तिने एक शब्दही का काढला नाही?” अशा आशयाची टीका कमाल खानने व्हिडीओ मार्फत केली आहे.

कमाल खान सोशल मीडियाद्वारे कायम विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने करोनाचे निमित्त साधून सारा अली खानवर टीका केली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 7:52 pm

Web Title: black lives matter kamaal r khan sara ali khan mppg 94
Next Stories
1 बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या तिघांची करोना चाचणी निगेटीव्ह
2 अभिनेत्याच्या मदतीला आला सोनू सूद धावून, फोन करुन केली विचारपूस
3 अल्पसंख्यांकांसमोर गुडघे टेकवा… दिग्दर्शकाने दिलं भारतीयांना चॅलेंज
Just Now!
X