News Flash

‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध

अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टशी तिने लग्न केलं.

‘ब्लॅक विडो’ फेम अभिनेत्री स्कारलेट जोहानसनने तिसरं लग्न केलं. अमेरिकन कॉमेडियन कॉलिन जोस्टशी ती गुपचूप विवाहबद्ध झाली. स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती. गेल्या आठवड्यातच तिने अत्यंत खासगी समारंभात लग्न केल्याचं समजतंय. २०१७ पासून स्कारलेट कॉलिनला डेट करतेय.

Meals on Wheels च्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर स्कारलेटच्या लग्नाविषयीची माहिती देण्यात आली आहे. स्कारलेटवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा : आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

याआधी २००८ मध्ये स्कारलेटने प्रियकर रायन रेनॉल्ड्सशी लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर २०११ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१४ मध्ये तिने रोमेन डॉरिअॅकशी लग्न केलं. हे लग्नसुद्धा केवळ तीन वर्षे टिकलं. २०१७ मध्ये स्कारलेटने घटस्फोट दिला. स्कारलेट आणि रोमेनला एक मुलगी असून रोझ असं तिचं नाव आहे. स्कारलेट आता ३४ वर्षांची असून कॉलिन ३८ वर्षांचा आहे. कॉलिनचं हे पहिलंच लग्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 1:59 pm

Web Title: black widow star scarlett johansson tied the knot with comedian colin jost ssv 92
Next Stories
1 KBC 12: १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?
2 ‘तारक मेहता..’च्या ‘गोगी’ला गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी; पाहा CCTV फुटेज
3 आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू
Just Now!
X