News Flash

काळवीट शिकार प्रकरण : सुनावणीला सलमान खान अनुपस्थित

पुढील सुनावणी १९ डिसेंबरला

सलमान खान

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणावर आज (२७ सप्टेंबर) सुनावणी होणार होती. मात्र सलमान न्यायालयात हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख दिली आहे. त्यामुळे आता सलमानला १९ डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर रहावं लागणार आहे.

४ जुलै रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चंद्र कुमार सोंगारा यांनी २७ सप्टेंबर रोजी सलमानला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. इतकंच नाही तर, जर तो न्यायालयात हजर झाला नाही तर त्याला मिळालेला जामीन रद्द करण्यात येईल असंही न्यायालयाने सांगितलं होतं. काही दिवसापूर्वी सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीमुळेच तो न्यायालयात हजर राहणार नाही अशी चर्चा साऱ्यांमध्ये होत होती. विशेष म्हणजे सलमान आज न्यायालयात आलाच नाही. मात्र त्याच्या न्यायालयात न येण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आणखी वाचा- …म्हणून सलमानच्या माजी अंगरक्षकाला पोलिसांनी दोरखंडानं पकडलं

दरम्यान, काळवीट शिकार प्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, या निर्णयानंतर त्याचा जामीन देण्यात आला होता. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमानने काळवीट शिकार केली होती. त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम कोठारी हेदेखील होते. मात्र त्यांना न्यायलयाने निर्दोष ठरविले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 1:48 pm

Web Title: blackbuck poaching case salman khan did not appear court today next hearing on 19 december ssj 93
Next Stories
1 ‘बिग बी’, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि ‘कुली’मधील तो अपघात, जाणून घ्या कनेक्शन
2 ठरलं! या दिवशी होणार ‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनची वापसी
3 Photo : जॅकी श्रॉफची लेक बॉयफ्रेंडसोबत दिसली बोल्ड अंदाजात, फोटो व्हायरल
Just Now!
X