महाराष्ट्रात करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या ९ लाख ४३ हजारांच्याही वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं. परंतु हा नियम अभिनेत्री कंगना रणौतसाठी मात्र क्षितील करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमधून मुंबईत आलेल्या कंगनाला क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्री संजना गलरानीला अटक

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार कंगना केवळ चारच दिवसांसाठी मुंबईत आली आहे. शिवाय हिमाचलमधून येताना तिने करोना चाचणी केली होती. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळेच तिला प्रवास करण्याची संमती देण्यात आली. त्यामुळे चार दिवसांसाठी मुंबईत आलेल्या कंगनाला मुंबई महापालिकेने क्वारंटाईनमधून सूट दिली आहे.

अवश्य पाहा – “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद देण्यात आली होती. यावर कंगनानं ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा’, असं म्हटलं होतं. दरम्यान कंगना आता मुंबईत दाखल झाली आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई विमानताळवर कंगना विरोधात घोषणाबाजी देखील केली होती.