टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम आणि बॉलीवूड चित्रपटांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली पंकज शर्मा उर्फ बॉबी डार्लिंग तिचा बॉयफ्रेण्ड रमणीक शर्मासोबत विवाहबद्ध झाली आहे. रमणीक शर्मा हा भोपाळस्थित उद्योजक आहे. रमणीक फक्त २८ वर्षांचा असून त्याने ४३ वर्षीय बॉबी डार्लिंगबरोबर लगीनगाठ बांधली. ११ फेब्रुवारीला मित्र आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. ‘क्या कूल है’ चित्रपटामुळे नावारूपाला आलेल्या बॉबीने २०१० मध्ये ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करुन लिंगबदलाच्या दिशेने पाऊल टाकले होते. त्यानंतर बॉबीने पूर्णपणे लिंगबदल शस्त्रक्रिया करुन घेतली होती.