News Flash

बॉबी डार्लिंगचा नवरा गजाआड, अनैसर्गिक सेक्स आणि मारहाणीचा आरोप

फेसबुक पेजवरही न्याय मिळण्यासाठी पोस्ट

बॉबी डार्लिंगने नवरा आपल्याला मारहाण करतो आणि अनैसर्गिक सेक्स करतो असा आरोप केला. ज्यानंतर बॉबी डार्लिंगचा नवरा रमणीक शर्माला अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी रमणीक शर्माला अटक करण्यात आल्याचे बॉबी डार्लिंगने सांगितले. बिग बॉस या कार्यक्रमामुळे प्रकाश झोतात आलेली बॉबी डार्लिंग आता या कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. सप्टेंबर २०१७ मध्येच तिने नवऱ्याविरोधात मारहाणीची तक्रार केली होती. बॉबी डार्लिंगने फेब्रुवारी २०१६ मध्ये भोपाळच्या रमणीक शर्मासोबत लग्न केले. स्पॉटबॉय इ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सप्टेंबर २०१७ मध्ये केलेल्या तक्रारीत रमणीक दारु पिऊन मला मारहाण करतो, माझे दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर असल्याचे खोटे आरोप करतो असे म्हटले होते. त्याने माझी प्रॉपर्टी बळकावली त्याला माझ्या मुंबईतल्या घरावरही हक्क हवा होता असाही आरोप बॉबी डार्लिंगने केला. या सगळ्या आरोपांनंतर बॉबी डार्लिंगने नवऱ्यावर हुंडा मागितल्याचाही आरोप केला आहे. एवढेच नाही तर रमणीक, त्याची आई आणि भाऊ या तिघांविरोधात बॉबीने तक्रार दाखल केली आहे.

बॉबी डार्लिंगविरोधात तिच्या सासूनेही तक्रार केली होती. बॉबीने लिंगबदल केला असला तरीही तिच्या वागण्यात बदल झालेला नाही. ती आम्हाला शिवीगाळ करते, आमच्याशी तिची वागणूक एखाद्या पहिलवानासारखी होती असेही रमणीकच्या आईने म्हटले होते. मागील वर्षापासूनच रमणीक आणि बॉबी या दोघांमध्ये वाद सुरु आहे. बॉबी डार्लिंगने तिच्या फेसबुक पेजवरही जस्टिस फॉर बॉबी डार्लिंग नावाची पोस्ट टाकली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 6:42 pm

Web Title: bobby darlings husband jailed for domestic abuse unnatural sex
Next Stories
1 एकट्या बाईवर समाज ‘अॅव्हेलेबल’चे लेबल सहज लावतो- नीना गुप्ता
2 ‘संजू’ची आतुरतेने वाट पाहणारी ‘ती’ आहे तरी कोण?
3 …जेव्हा भान हरपून श्रद्धा, राजकुमार नाचतात
Just Now!
X