24 November 2020

News Flash

Lok sabha Election 2019 : प्रचारसभांना अनुपस्थित असणारा बॉबी सनी देओल यांच्या विजयाविषयी म्हणतो…

सनी देओल यांचा ८२ हजार ४५९ मतांनी विजय झाला आहे

सनी देओल, बॉबी देओल

लोकसभा निवडणूक २०१९ ची मतमोजणी नुकतीच पार पडली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मते मिळाली आहेत. त्यामुळे केंद्रामध्ये भाजपा सरकार येणार हे निश्चित झालं आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींना उमेदवारी देण्यात आली होती. या सेलिब्रिटींपैकी सनी देओल हे एक आहे.

सनी देओल यांनी पंजाबमधील गुरुदासपूरमधून निवडणूक लढविली होती. विशेष म्हणजे ८२ हजार ४५९ मतांनी त्यांचा विजय झाला आहे.सध्या त्यांच्यावर सर्व स्तरांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्येच त्यांचा लहान भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल यानेदेखील सनी देओल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉबी देओलने इन्स्टाग्रामवर सनी देओल यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “नेहमीप्रमाणेच आजही मला तुझा गर्व आहे भैय्या”, असं कॅप्शन बॉबीने या फोटोला दिलं आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी सनी देओल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.सोबतच बॉबीची ही पोस्ट शेअरही केली आहे.

 

View this post on Instagram

 

Always proud of you Bhaiya

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol) on

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सनी यांच्या प्रचारसभांमध्ये बॉबी देओल नसल्यामुळे अनेक चर्चा रंगल्या होत्या. काहींनी टीकादेखील केली होती. मात्र वैयक्तिक कारणांमुळे मी सभांना येऊ शकत नाही.मात्र सनी देओल यांना माझा पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्टीकरण बॉबीने दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 10:52 am

Web Title: bobby deol bhaiya sunnys election victory
Next Stories
1 सलमान म्हणतो, ‘मैंने प्यार किया’च्या यशाचं क्रेडिट लक्ष्मीकांत बेर्डेंना
2 चित्र रंजन : मोदी, मोदी आणि मोदीच!
3 विश्वचषकामध्ये निक देणार टीम इंडियाला पाठिंबा
Just Now!
X