News Flash

बॉबी देओलचे वेब विश्वात पदार्पण, सीरिजमधील फर्स्ट लूक प्रदर्शित

ही सीरिज २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

सध्या करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत घेतली. दरम्यान अनेक कलाकारांनी वेब सीरिमधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण देखील केले. आता या अभिनेत्यांच्या यादीमध्ये बॉबी देओलचे नाव देखील आले आहे. लवकरच अभिनेता बॉबी देओल डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

बॉबी देओलने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. ‘हा आहे आश्रमधील फर्स्ट लूक. ही वेब सीरिज २८ ऑगस्ट २०२० रोजी एमएक्स प्लेअरद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘आश्रम’ या सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत चंदन रॉय सान्याल, आदिती पोहणकर, दर्शन कुमार आणि अध्ययन सुमन हे कलाकार दिसणार आहे. तसेच या सीरिजचे दिग्दर्शन प्रकाश झा करत आहेत.

बॉबीने शेअर केलेल्या वेब सीरिजच्या फर्स्ट लूकमध्ये तो एकदम वेगळ्या अंदाजाच दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून तो साधूच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सीरिजचा फर्स्ट लूक पाहता चाहत्यांमध्ये सीरिज विषयी उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 9:21 am

Web Title: bobby deol prakash jha web series aashram to release on august 28 avb 95
Next Stories
1 व्हायरल झालेल्या व्हिडीओवर रिया चक्रवर्तीचे स्पष्टीकरण, म्हणाली…
2 सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले..,
3 सुशांतसिंह आत्महत्या : ‘ईडी’कडून गुन्हा दाखल
Just Now!
X