‘बॉबी जासूस’ या दिया मिर्झाच्या चित्रपटातील गुप्तहेराच्या व्यक्तीरेखेसाठी विद्या बालन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा नुकताच नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. मात्र, या पोस्टरमध्ये विद्याची झलक पाहावयास मिळत नाही. चित्रपटाच्या पोस्टरवर डोळ्यांना दुर्बिण लावलेल्या महिलेचा चेहरा रेखाटण्यात आला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारण्यासाठी विद्या नावाजली जाते. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहाणी’, ‘घनचक्कर’ या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर आता विद्या ‘बॉबी जासूस’मध्ये हेराच्या भूमिकेत दिसणार आहे. दिया मिर्झाच्या फ्री एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेला ‘बॉबी जासूस’ या वर्षी प्रदर्शित होणार आहे.