News Flash

Photo : पाहा, नवाजुद्दीन -मौनी रॉयच्या ‘बोले चुडिया’च्या पोस्टरची पहिली झलक

त्यांचा हा लूक पाहता हे दोघं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत

Photo : पाहा, नवाजुद्दीन -मौनी रॉयच्या ‘बोले चुडिया’च्या पोस्टरची पहिली झलक

छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अनेकांना भूरळ घातली आहे. तिच्या याच अभिनय कौशल्यामुळे आता तिचा खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मौनी लवकरच ‘बोले चुडिया’ या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉय ‘बोले चुडिया’ या चित्रपटामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवाजचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी करणार आहे. ‘बोले चुडिया’च्या माध्यमातून शमास पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरचे फोटो मौनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नवाजने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट परिधान केली आहे. तर मौनी एका दाराच्या आड उभी असल्याचं दिसून येत आहे. त्यांचा हा लूक पाहता हे दोघं नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, कायम गंभीर आणि महत्वपूर्ण भूमिकांना प्राधान्य देणारा नवाजुद्दीन या चित्रपटामध्ये रोमॅण्टीक अंदाजात पाहायला मिळणार आहे. तर मौनी रॉय या चित्रपटव्यतिरिक्त ‘मेड इन चाइना’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 3:10 pm

Web Title: bole chudiyan first look posters nawazuddin siddiqui mouni roy
Next Stories
1 लग्नानंतर वर्षभरातच कपिल शर्मा होणार बाबा
2 ‘देखा, योगा से ही होगा’ म्हणत शिल्पा शेट्टीने दिल्या शुभेच्छा, मोदी म्हणाले..
3 हॉलिवूड सुपरस्टार ख्रिस्तोफर नोलानच्या चित्रपटात झळकणार ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री
Just Now!
X