News Flash

आमिर खानच्या मुलीनं शेअर केले साडीतील फोटो; लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

इराला भारतीय कपड्यांचीदेखील आवड आहे.

आमिर खानची मुलगी इरा खान ही फॅशनच्या बाबतीत अनेकांना टक्कर देत असते. यापूर्वीही इन्स्टाग्रामवर तिनं आपले स्टायलिस्ट लूकमधील फोटो शेअर केले आहेत. परंतु तिला मॉडर्न कपड्यांसोबतच भारतीय कपड्यांचीदेखील आवड आहे. नुकताचं तिनं आमिर खानसोबतचा एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती एक पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे.

आमिर खानची भाची जायन मारी खान हिनं चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रिमिअरला आमिर खान, त्याची पत्नी किरण राव आणि मुलगी इरा हे ऑनलाइन उपस्थित होते. यासाठी सर्वच जण विशेष पद्धतीनं तयारही झाले होते. यादरम्यानचे काही फोटो इरानं शेअर केले आहेत.

इरानं पिवळ्या साडीतले आपले काही फोटो शेअर केले आहेत. इराचा हा लूक सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. तिच्या फोटोवर अनेकांचे लाईक्स मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 9:53 pm

Web Title: bollywood actor aamir khan daughter shares stunning hot look saree photos instagram jud 87
Next Stories
1 श्री कृष्ण मालिकेत या अभिनेत्रीने साकारले आहे ‘राधा’ हे पात्र
2 ‘चला हवा येऊ द्या’ मधील निलेश साबळेच्या पत्नीला पाहिलेत का?
3 ‘या’ भारतीय गाण्यानं केला विक्रम; १२ दिवसांत मिळवले ५ कोटी व्हूज
Just Now!
X