आमिर खानला बॉलिवूडचं मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जात असलं, तर अमरीश पुरी यांना खलनायकांचे बादशाह म्हटलं जायचं. एक वेळ अशी होती जेव्हा फक्त अमरीश पुरी यांच्या नावावर एखादा चित्रपट चालायचा. अमरीश पुरी यांनी ४० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक छोट्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं. शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण एका अभिनेत्यासोबत चित्रपट करण्याची संधी त्यांना कधीच मिळाली नाही. तो म्हणजे आमिर खान. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना. पण यामागचं कारण ऐकून तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल.

रुपेरी पडद्यावर आमिर खान आणि अमरीश पुरी कधीच एकत्र झळकले नाही. यामागचं कारण आहे अमरीश पुरी यांनी केलेला आमिर खानचा अपमान. अमरीश पुरी यांनी एकदा चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर आमिर खानचा अपमान करत चांगलंच सुनावलं होतं. हा अपमान आमिर खानच्या मनाला इतका लागला की, त्याने कधीच अमरीश पुरी यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच जेव्हा कधी अमरीश पुरी चित्रपटात असणारी स्क्रिप्ट त्याच्याकडे यायची तो चित्रपट करण्यास नकार द्यायचा.

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

ही १९८५ मधील गोष्ट आहे. ‘जबरदस्त’ या चित्रपटाचं शुटिंग तेव्हा सुरु होतं. आमिर खानने तेव्हा अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली नव्हती. आपले काका आणि दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याकडे आमिर खान सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. चित्रपटात संजीव कुमार, सनी देओल, राजीव कपूर, जया प्रदा आणि अमरीश पुरी मुख्य भूमिकेत होते.

आमिर खानकडे त्यावेळी अॅक्शनची जबाबदारी देण्यात आली होती. आमिर खान योग्य पद्धतीने सीन शूट करुन घेईल याची खात्री असल्याने नासिर हुसैन आराम करण्यासाठी गेले होते. आमिरने अमरीश पुरी यांनी सगळा सीन व्यवस्थित समजावून सांगितला होता. पण जेव्हा सीन शूट होत होता तेव्हा आमिरला तो योग्य वाटत नव्हता. यामुळे आमिर वारंवार त्यांना रोखत होता. एका क्षणानंतर अमरीश पुरी संतापले आणि त्याला सगळ्यांसमोर हा कालचा मुलगा, आता मला समजावणार असं म्हणत सर्व युनिटसमोर अपमान केला.

नासिर हुसैन जेव्हा सेटवर परतले तेव्हा त्यांना घडल्या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी अमरीश पुरी यांना बाजूला नेलं आणि समजावलं. आमिर खान आपला भाचा असून दिग्दर्शनातील बारीक गोष्टी शिकत असल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्ही खरंच सीन चुकीचा करत होतात. आमिर त्याच्या जागी योग्य आहे असंही त्यांनी समजावलं. यानंतर अमरीश पुरी यांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी सर्वांसमोर आमिर खानची माफी मागितली. त्यावेळी आमिरने त्यांना माफ केलं. पण तो अपमान आमिर कधीच विसरला नाही. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये त्याने कधीच अमरीश पुरी यांच्यासोबत काम केलं नाही. इतकंच नाही एखाद्या चित्रपटात अमरीश पुरी असतील तर तो चित्रपट करण्यास तो सरळ नकार द्यायचा.