News Flash

आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता

..हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरला.

लगान

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित ‘लगान’ हा चित्रपट अनेकांच्याच आवडीचा आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका आणि संवाद प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. परफेक्शनिस्ट आमिर खानची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये भारतीय इतिहासातील एका अनोख्या घटनेवर उजेड टाकण्यात आला होता. या चित्रपटातून आमिर आणि नवोदित अभिनेत्री ग्रेसी सिंग यांच्या जोडीने त्यावेळी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा चित्रपट लागला की अनेकजण टिव्हीपासून दूर जात नाहीत. अशा या चित्रपटामध्ये आमिरने साकारालेल्या ‘भुवन’ला दगा देऊन इंग्रजांशी हातमिळवणी करणारा ‘लाखा’ही कोणीच विसरु शकलं नाहीये.

‘लगान’मध्ये लाखाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती. ही भूमिका साकारली होती, अभिनेता यशपाल शर्माने. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचे धडे घेणाऱ्या यशपालने साकारलेल्या लाखाच्या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. खरंतर या चित्रपटात त्यांनी आमिर साकारात असलेल्या पात्राला दगा दिला असला तरीही अभिनय कारकिर्दीत मात्र तो फार यशस्वी झाला. गोविंद निहलानी यांच्या ‘हजार चौरासी की माँ’ या चित्रपटातून त्याला पहिला ब्रेक मिळाला होता. या चित्रपटात जया बच्चन, नंदिता दास यांच्यासोबत काम करण्याची संधी यशपालला मिळाली होती.

वाचा : जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…

lakha

त्यानंतर त्याला ‘लगान’ चित्रपटासाठी विचारण्यात आलं. याविषयीच एका मुलाखतीत सांगताना यशपाल याने चित्रपटातील त्याचा अनुभव सर्वांसमोर मांडला. ‘लगान’च्या चित्रीकरणावेळी यशपालच्या कारकिर्दीतील अगदी सुरुवातीचे दिवस होते. त्यावेळी तो ऑ़डिशनसाठी गेला असता मानधनाच्या आकड्यावरुन यशपालच्या मनात साशंकता होती. पण, न मागताच यशपालला चांगलच मानधन मिळत होतं. त्यावेळी त्याला दीड लाख रुपये इतकं मानधन देण्याबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा त्याने दोन लाखांची मागणी केली आणि रिना दत्त लगेचच त्यासाठी तयार झाल्या. हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरला.

वाचा : Father’s Day 2017: मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

‘लगान’नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत चौकटी बाहेरील भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये यशपाल शर्मा हे नाव नव्याने ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’, ‘गंगाजल’, ‘आरक्षण’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकांनाही प्रेक्षकांनी दाद दिली. चित्रपटांसोबतच मालिकांमध्येही त्यांनी काही भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 6:21 pm

Web Title: bollywood actor aamir khan starrer lagaan actor yashpal sharma tells how he got the role of lakha and also talks about his bollywood career
Next Stories
1 अरुणभ कुमारचा ‘टीव्हीएफ’च्या सीईओपदाचा राजीनामा
2 अबू सालेमचा फक्त आवाज ऐकूनच प्रेमात पडली होती मोनिका
3 नाटय़रंग : नातेसंबंध उलगडणारं नाटय़
Just Now!
X