20 April 2019

News Flash

ऐश्वर्याला मिळालेला पुरस्कार पाहून अभिषेक म्हणाला….

कलाविश्वात विविध कारणांनी आपली अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिलिब्रिटींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन.

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन

कलाविश्वात विविध कारणांनी आपली अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सिलिब्रिटींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या अभिनयासोबतच काही सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशीसुद्धा जोडली गेलेली आहे. आपल्या कामाचं इतरांनी अनुकरण करावं, या उद्देशाने आणि तितक्याच प्रभावीपणे ती विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच उल्लेखनीय कामगिरीसाठी तिला नुकताच मेरिल स्ट्रीप अवॉर्ड फॉर एक्सेलंस देण्यात आला.

वॉशिंग्टन डीसी येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी मुलगी आराध्याही तिच्यासोबत उपस्थित होती. ऐश्वर्याला पुरस्कार मिळताच सर्वाधिक आनंद झाला तो म्हणजे पती अभिषेक बच्चन याला. ऐश्वर्याला पुरस्कार मिळाल्याचं कळताच त्याने ट्विट करत तिचा पुरस्कार स्वीकारते वेळीचा फोटो पोस्ट केला. त्यासोबतच आपल्याला या क्षणाला प्रचंड अभिमान वाटत असल्याचंही त्याने या ट्विटमध्ये लिहिलं होतं.

वाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

खुद्द ऐश्वर्यानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट करत सर्वांचंच लक्ष वेधलं. या फोटोंमध्ये तिच्यासोबत आराध्याही दिसत असून, तिच्या चेहऱ्यावरील आनंदही पाहण्याजोगा आहे. या पुरस्कारासाठी तिने सर्वांचेच मनापासून आभार मानले आहेत. ऐश्वर्याव्यतिरिक्त झोया अख्तर, धडक फेम अभिनेत्री जान्हवी कपूर यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

First Published on September 11, 2018 10:00 am

Web Title: bollywood actor abhishek bachchan note for aishwarya rai as she wins meryl streep award