News Flash

‘या’ कारणामुळे होतेय दिशा- आदित्यची चर्चा

जाणून घ्या, नेमकी कसली आहे चर्चा

अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी ही जोडी सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. अलिकडेच त्यांची मुख्य भूमिका असलेला ‘मलंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे पडद्यावर एकत्र झळकलेल्या या जोडीची सध्या लोकप्रियता झपाट्याने वाढल्याचं दिसून येत आहे. ‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’ने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येऊ शकतो.

पूर्वी लोकप्रियतेमध्ये आदित्य २१ तर दिशा १५ व्या स्थानावर होते. मात्र ‘मलंग’चा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये झपाट्याने वाढ झाली. आदित्य २१ व्या स्थानावरुन ११ व्या स्थानावर पोहोचला. तर दिशा १५ व्या स्थानावरुन ५ व्या क्रमांकावर पोहोचली. विशेष म्हणजे या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा :  निक-प्रियांकाच्या लग्नात घडलेल्या ‘या’ गोष्टीमुळे सासूबाई नाराज!

‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’ने १३ फेब्रुवारीपर्यंत केलेल्या आकडेवारीनुसार, आता आदित्य ५ व्या स्थानावर आहे. तर दिशा ४थ्या स्थानावर पोहोचली आहे.
“आदित्य आणि दिशा, युवा वर्गात खूप लोकप्रिय आहेत. ‘मलंग’मुळे या दोघांच्याही लोकप्रियतेत चांगलाच फरक पडलेला दिसून आला. युवावर्ग सध्या त्यांना फिटनेसमध्ये फॉलो करु लागला आहे. तसंच ‘मलंग’ चित्रपट प्रदर्शित होण्यावेळी त्यांच्याविषयी अनेक लेख छापून आले होते. त्यामुळेदेखील त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे, असं अश्वीन कौल यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 12:37 pm

Web Title: bollywood actor aditya roy kapoor and disha patani famous malang movie ssj 93
Next Stories
1 ‘ही लोकं अक्कलशून्य माकडं आहेत’; तोतरेपणाची खिल्ली उडवणाऱ्यांवर हृतिक भडकला
2 निक-प्रियांकाच्या लग्नात घडलेल्या ‘या’ गोष्टीमुळे सासूबाई नाराज!
3 बूट पॉलिश करणाऱ्या सनी हिंदुस्तानीने जिंकला ‘इंडियन आयडॉल’चा किताब
Just Now!
X