शाहरुख खान, अक्षय कुमार, सैफ अली खान या कलाकारांनी प्रेक्षकांवर आपली छाप सोडल्यानंतर आता त्यांची पुढची पिढी म्हणजेच त्यांची मुलं या कलाविश्वात येण्यासाठी सज्ज झाली आहेत. शाहरुख आणि सैफच्या मुलांविषयी सांगावं तर त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. त्यातच सुहानाच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमुळे या चर्चांना आणखी हवा मिळत आहे. आता यात आरव भाटिया म्हणजेच खिलाडी कुमारच्या मुलाचाही समावेश झाल्याचं कळत आहे.
काही दिवसांपूर्वीच आरव आणि सैफचा मुलगा इब्राहिम याला एकत्र पाहण्यात आलं होतं. ज्यानंतर त्याच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी बऱ्याचजणांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. अक्षय कुमारलाही ‘गोल्ड’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत आरव बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी अतिशय लहान असल्याचं सांगत अक्षय म्हणाला, ‘सध्यातरी तो अभ्यासातच स्वारस्य दाखवत आहे.’ आपला मुलगा सध्या मुंबईतच शिक्षण घेत असून, त्याचं हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लंडनमध्ये जाऊन पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्याता त्याचा मानस असल्याचं कळत आहे. किंबहुना तिथे त्याला कोणत्या ठिकाणी शिकायचं आहे याची सर्व माहितीसुद्धा त्याने मिळवली आहे.
वाचा : Friendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी
आपल्या मुलाविषयी ही माहिती देत खिलाडी कुमारने त्याच्या बॉलिवूड पदार्पणाला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आतातरी या चर्चा शमणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खिलाडी कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे दोघंही आपल्या मुलांना आणि कुटुंबाला नेहमीच प्राधान्य देताना दिसतात, त्यामुळे त्यांच्या भविष्याच्याच दृष्टीने ते कायम सतर्क असल्याचंही पाहायला मिळतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 11:28 am