News Flash

ऐश्वर्याला पाहताच प्रत्येक वेळी माझे भान हरपायचे, बॉलिवूड अभिनेत्याची कबुली

माझ्यासाठी ही गोष्ट काहिशी लाजिरवाणी होती.

ऐश्वर्या राय बच्चन

अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या आगामी ‘इत्तेफाक’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून हजेरी लावत आहे. अशाच एका कार्यक्रमादरम्यान चित्रपटाचा निर्माता करण जोहर याने अक्षय खन्नाला एक प्रश्न विचारला. ‘संपूर्ण चित्रपटसृष्टीत तू सर्वात मादक अभिनेत्री म्हणून कोणत्या अभिनेत्रीच्या नावाला पसंती देशील?’, असा प्रश्न करणने त्याला विचारला. या प्रश्नाचे उत्तर देत अक्षयने लगेचच अभिनेत्री ऐश्वर्या रायचे नाव घेतले.

आपल्या या उत्तराबद्दल स्पष्टीकरण देत अक्षय म्हणाला, ‘तिला मी जेव्हा जेव्हा तिला भेटायचो तेव्हा तिच्यावरुन माझी नजरच हटायची नाही. माझे भानच हरपायचे. माझ्या मते लोक आपल्याकडे अशा प्रकारे पाहत राहतात याची तिलाही कल्पना असावी. किंबहुना तिला या साऱ्याची सवयच असावी. पण, माझ्यासाठी ही गोष्ट काहिशी लाजिरवाणी होती. कारण, कोणाकडे असे एकटक पाहात राहणे, त्यांना न्याहाळणे या साऱ्याची मला सवय नव्हती. पण, तिचे सौंदर्य पाहता तुम्हीही तिच्याकडे वेड्यासारखे एकटक पाहात राहाल’. अक्षयच्या या वक्यव्यानंतर सोनाक्षीनेही त्याचे समर्थन केले. ‘फक्त मुलंच नाही तर, मी सुद्धा तिच्याकडे एकटक पाहात बसायचे. त्या फारच सुंदर दिसतात’, असे ती म्हणाली.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

‘ताल’ या चित्रपटातून ऐश्वर्या आणि अक्षयची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गाणी, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींमुळे ‘ताल’ सुपरहिट ठरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2017 6:16 pm

Web Title: bollywood actor akshaye khanna says cant take my eyes off taal co actor aishwarya rai bachchan every time i meet her
Next Stories
1 ‘मिस्टर इंडिया’च्या सिक्वलमध्ये दिसणार या सेलिब्रिटी मायलेकी?
2 अखेर चुलत बहिण राणीला भेटायला गेली काजोल!
3 लवकरच अनिल-माधुरी चाहत्यांची ‘धकधक’ वाढवणार?
Just Now!
X