20 September 2018

News Flash

‘हा’ अभिनेता साकारणार पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागारांची भूमिका

त्याच्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक ठरणार आहे.

द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर

बराच काळ काही सेलिब्रिटी रुपेरी पडद्यापासून दूर राहतात. चित्रपटांची चलती असतानाही काही चेहरे या झगमगाटापासून दूर राहण्याचं कारण बऱ्याचदा त्यांच्या वाट्याला येणाऱ्या चित्रपटांचं कथानक असतं. सहसा दमदार कथानकाच्या शोधात असणाऱे सेलिब्रिटी एखाद्या चित्रपटासाठी होकार देताना बराच विचार करतात. सध्याच्या घडीला अभिनेता अक्षय खन्नासुद्धा अशाच परिस्थितीतून जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘मॉम’ या चित्रपटातून झळकल्यानंतर अक्षयने काही दिवस चित्रपट विश्वापासून दूर राहणं पसंत केलं.

HOT DEALS
  • Apple iPhone 7 Plus 32 GB Black
    ₹ 59000 MRP ₹ 59000 -0%
  • Lenovo Phab 2 Plus 32GB Champagne Gold
    ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%
    ₹900 Cashback

आपल्या वाट्याला येणारे चित्रपट आणि लोकप्रियता या सर्व गोष्टी अत्यंत संथ गतीने होतात. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही यश किंवा इतरांकडून मिळणारा सन्मान सहजपणे तुमच्या वाट्याला येईल अशी अपेक्षाच करु नका कारण या गोष्टी कर्तृत्वाने कमवाव्या लागतात, अशा विचारसणीवर अक्षय ठाम होता. याच मार्गावर चालणाऱ्या अक्षयची एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी वर्णी लागली आहे. ती भूमिका म्हणजे, पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागारांची. बसला ना तुम्हालाही धक्का?

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

Akshaye Khanna छाया सौजन्य- इकॉनॉमिक टाइम्स

अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून अक्षय झळकणार आहे. या चित्रपटात तो भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या माध्यम सल्लागार आणि वरिष्ठ प्रवक्त्यांची म्हणजेच संजय बारू यांची भूमिका साकारणार आहे. मुळात संजय बारू यांच्याच ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असल्यामुळे अक्षयसाठी ही भूमिका आव्हानात्मक ठरणार आहे. खुद्द अक्षयही ही भूमिका साकारण्यासाठी फारच उत्सुक असल्याचं त्याने ‘इकॉनॉमिक टाइम्स’शी संवाद साधताना सांगितलं होतं. एका वेगळ्याच विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाचा भाग होण्यआची संधी मिळाल्याचा आपल्याला प्रचंड अभिमान वाटत असून, बारु यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा चित्रपटाच्या माध्यमातून योग्य तो न्याय देणं अपेक्षित आहे, हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं. त्यामुळे एका अद्वितीय भूमिकेतून झळकणाऱ्या अक्षयला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on March 13, 2018 2:49 pm

Web Title: bollywood actor akshaye khanna to play sanjaya baru in anupam khers movie the accidental prime minister