बॉलिवडूचा मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर तसचं आर माधवन आणि  शरमन जोशी यांच्या ‘थ्री इडियट्स’ या सिनेमाने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. २००९ सालात आलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राज कुमार हिरानी यांनी केलं असून हा सिनेमा सुपरहीट ठरला होता. या सिनेमाच्या कथानकामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली होती. मात्र या सिनेमानंतर अभिनेता अली फजल यांच्या आयुष्यात काही वेगळाच बदल झाला होता. अली फजल नैराश्यात गेला होता.

तुम्हाला कदाचित कल्पना नसेल मात्र अभिनेता अली फजल यानेदेखील ‘थ्री इडियट्स’ या सिनेमात एक भूमिका साकारली होती. या सिनेमात अली फजलने जॉय लोबो नावाच्या एका विद्यार्थ्यांची भूमिका साकारली होती. सिनेमात इंजिनिअरिंगच्या अखेरच्या वर्षात असलेला जॉय खिडकीतून उडी मारून आत्महत्या करतो. जॉयच्या या भूमिकेनंतर अली नैराश्यात गेला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलखतीत अलीने या भूमिकेनंतर घडलेल्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

पीपिंग मूनला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अली फजल म्हणाला, “जेव्हा मी थ्री इटयट्स सिनेमासाठी काम केलं तेव्हा मी नैराश्यात गेलो होतो. खरं तर मी सिनेमात एक छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र या भूमिकेनंतर काय झालं याची कुणाला कल्पना नसेल. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या बातम्यामाझ्या समोर आल्या. त्यानंतर मला एका वृत्त वाहिनीतून फोन आला. हा फोन माझ्या प्रतिक्रियेसाठी होता. ‘सर तुम्ही जी भूमिका साकारली होती अगदी तसचं घडलंय तुमची काय प्रतिक्रिया आहे?’ असं मला विचारण्यात आल्यानंतर मी खूपचं अस्वस्थ झालो होतो.” असं अली फजल म्हणाला.

हे देखील वाचा: “५१८ सिनेमांमध्ये काम करूनही यांनी मला ओळखलं नाही”; अनुपम खेर यांचा व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

पहा फोटो: उर्वशी रौतेलाच्या सौंदर्यापेक्षा लाखो रुपयांच्या पटोला साडीची अधिक चर्चा !

पुढे या मुलाखतीत अली म्हणाला, “तेव्हा कॉलेजमध्ये मी होतो. मी खूपत निरागस होतो. मी नैराश्यात गेले होतो. मी आमचे दिग्दर्शक राजू सर आणि काही लोकांशी बोललो. या सर्वांनी मला समजावलं. मी कोणताही उलट सुलट निर्णय घेऊ नये आणि असा विचार करू नये असं त्यांनी समजावलं” असं म्हणच अलीने त्याला आलेल्या नैराश्यावर त्याने मात केल्याचं सांगितलं.

नेटफ्लिस्कवर रिलिज होणाऱ्या ‘रे’ या सिनेमातून अली फजल चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.