07 March 2021

News Flash

बिग बींच्या आव्हानासमोर रणवीरनेही घेतली माघार

अगदी कमी काळात बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात आलेल्या रणवीर सिंगच्या चाहत्यांच्या आकड्यात दिवसागणिक भर पडत आहे.

अमिताभ बच्चन, रणवीर सिंग

अगदी कमी काळात बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात आलेल्या रणवीर सिंगच्या चाहत्यांच्या आकड्यात दिवसागणिक भर पडत आहे. त्याच्या या चाहत्यांमध्ये आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचं. रणवीरच्या ड्रेसिंग स्टाइलवर फक्त त्याच्या चाहत्यांचीच नजर असते असं नाही, तर आता तर बिग बीसुद्धा त्याच्या स्टाइलला कॉपी करु लागले आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी रणवीरला आव्हानही दिलं आहे.

‘फॅशनची हीच काय ती परिसीमा आहे… आता मी रणवीर सिंगला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे’, असं म्हणत बिग बींनी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर लगेचच नेटकऱ्यांनीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत याविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली. त्यातच रणवीरचं लक्षही बिग बींच्या या पोस्टवर गेलं. पण, रणवीरने मात्र या दिग्गज अभिनेत्याचं आव्हान स्वीकारलेलं नाही. रणवीरने या फोटोवर कमेंट करत लिहिलं, ‘इथे कोणत्याची प्रकारची स्पर्धा होणार नाहीये, मी हरलो असं जाहीर करतो.’

वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं

बी- टाऊनच्या या दोन्ही अभिनेत्यांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ही चर्चा आणि फॅशनच्या मुद्द्यावरुन न रंगलेल स्पर्धा बरीच प्रकाशझोतात आली आहे. बिग बी सोशल मीडियावर असल्यामुळे या अनोख्या दुनियेत ते सध्या चांगलेच रमले आहेत. मुख्य म्हणजे फॉलोअर्सचा आकडा, त्यांच्या प्रतिक्रिया आणि ट्रेंडमध्ये असणाऱ्या गोष्टी या साऱ्याकडेही बिग बी जातीने लक्ष देतात असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 3:44 pm

Web Title: bollywood actor amitabh bachchan challenges ranveer singh over whos more excessive see photo
Next Stories
1 यंत्र आणि कामगार यांच्यातलं नातं अधोरेखित करणारा ‘लेथ जोशी’
2 एकता कपूरच्या ‘लैला-मजनू’चा टीझर प्रदर्शित
3 Movie Special : तृतीयपंथीयांच्या भावनांचा शोध घेणारा ‘नगरकीर्तन’
Just Now!
X