06 August 2020

News Flash

बिग बींनी दिला जुन्या आठवणींना उजाळा; मुलांसोबत फोटो शेअर करत म्हणतात…

बिग बींनी शेअर केला थ्रोबॅक फोटो

अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ट्विटरवर सर्वाधिक वावर असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. अनेक वेळा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. परंतु सध्या त्यांनी त्यांचा मोर्चा इन्स्टाग्रामकडे वळविला असून बऱ्याच वेळा ते कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी अभिषेक आणि श्वेतासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बिग बींनी शेअर केलेला फोटो जुना असून यात अभिषेक आणि श्वेता लहान असल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी कसे काय इतके मोठे झालात? असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

कैसे इतने बड़े हो गये ?!!

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on


दरम्यान, बिग बी यांचं त्यांच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम असून प्रत्येक वेळी त्यांचं कुटुंबाप्रतीचं प्रेम पाहायला मिळतं. अनेक वेळा ते श्वेता, आराध्या यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असतात. अलिकडेच त्यांची मुख्य भूमिका असलेला ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावल्याचं पाहायला मिळालं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 11:33 am

Web Title: bollywood actor amitabh bachchan compares abhishek and shweta childhood photo with present ssj 93
Next Stories
1 उर्वशी रौतेलाने वाढवली फी; ‘व्हर्जिन भानुप्रिया’साठी घेतले तब्बल इतके कोटी रुपये
2 ते फकस्त ६०० व्हते…पाहा ‘जंगजौहर’चं नवीन पोस्टर
3 अंकिताची तब्येत बिघडताच सुशांतच्या जीवाची झाली होती घालमेल; थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X