News Flash

महानायक अमिताभ बच्चन कोणाचे चाहते आहेत माहितीये?

त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.

amitabh bachchan
अमिताभ बच्चन

बऱ्याच दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आणि कलाविश्वात आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या बिग बी यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बऱ्याच गोष्टी कानांवर पडल्या होत्या. रुपेरी पडद्यावर अमिताभ यांनी बऱ्याच भूमिका साकारल्या. याच भूमिकांच्या बळावर त्यांच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत गेला. पण, खुद्द अमिताभ बच्चन कोणाचे चाहते होते असा प्रश्न विचारला की अनेकजण तर्क लावतात. या तर्कांमधून अभिनेत्री हेमा मालिनी, रेखा, जया बच्चन हीच नावं सहसा समोर येतात. पण, या नावांच्या गर्दीत एक नाव मात्र दूरच राहिलं. ते नाव म्हणजे महाराणी गायत्री देवी.

हे खरंय…. खुद्द अमिताभ बच्चन यांनीच याबाबतची माहिती दिली होती. दिल्ली विद्यापीठात शिकतानाच्या दिवसांना त्यांनी उजाळा दिला होता. त्यावेळी दिल्लीमध्ये एअरफोर्स कॉलनीच्या समोर जयपूर पोलो ग्राऊंड होतं. त्यावेळी तिथे जयपूरचे महाराज सवाई मान सिंगसुद्धा यायचे. त्यांच्यासोबत पत्नी आणि महाराणी गायत्री देवीसुद्धा असायच्या. जयपूरची राजमाता म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश होता.

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

नाकी- डोळी सुंदर असणाऱ्या गायत्री देवींच्या सजण्याचा अंदाजही वेगळाच होता. सहसा शिफॉनच्या साड्या नेसण्याला प्राधान्य देणाऱ्या या महाराणी ज्यावेळी पोलो ग्राऊंडवर पोहोचायच्या त्यावेळी सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर खिळायच्या. त्यांचे अनेक चाहते होते असं म्हणायला हरकत नाही. त्यातीलच एक नाव म्हणजे अमिताभ बच्चन. अमिताभ जयपूर पोलो ग्राऊंडवर सामना पाहण्यासाठी नाही तर गायत्री देवी यांची एक झलक पाहण्यासाठी जायचे. पुढे नशिबाने अशी काही खेळी खेळली ज्यामुळे बिग बींना गायत्री देवींना भेटण्याची संधी मिळाली. गायत्री देवींना लक्झरी गाड्यांची फार आवड होती. त्यांनी परदेशातून काही गाड्याही मागवल्या होत्या. त्यासोबतच त्या खूप चांगल्या गोल्फ खेळाडूही होत्या. गायत्री देवी आज आपल्यात नसल्या तरीही त्यांचा अंदाज, सौंदर्य आणि एकंदर राजेशाही थाट यांमुळे आजही त्या अनेकांच्याच स्मरणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 3:34 pm

Web Title: bollywood actor amitabh bachchan visits polo ground just to have a glimpse of maharani gayatri devi
Next Stories
1 आता हेच बाकी होतं, ‘पिया’ आणि त्याची ‘पहरेदार’ जाणार हनिमूनला
2 पतीसोबत व्हिडिओ चॅट करताना या मॉडेलने घेतला गळफास
3 जाणून घ्या रिअॅलिटी शोसाठी बिग बी, शाहरुख, सलमान यांना मिळणाऱ्या मानधनाचा आकडा
Just Now!
X