31 October 2020

News Flash

आराध्यासोबतचा ‘सुपरक्युट’ फोटो पोस्ट करत बिग बींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

तिचं हसूच आवरत नव्हतं.

छाया सौजन्य- अमिताभ बच्चन/ फेसबुक

सरत्या वर्षाला निरोप देत अनेकांनीच २०१८ चे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. सोशल मीडियापासून ते अगदी गल्लीबोळापर्यंत सर्वच ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळाला. कलाकारही या उत्साहापासून दूर नाही. याचेच उदाहरण पाहायल मिळाले बिग बींच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून. महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असतात. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यातही ते मागे राहिले नाहीत. यावेळी त्यांनी आपल्या नातींसोबतचे फोटो पोस्ट करत २०१८ चे स्वागत करणारा एक संदेश लिहिला.

नव्या नवेली आणि आराध्या या दोघींसोबतचे बिग बींचे हे फोटो पाहता, नातींवर असलेले त्यांचे निखळ प्रेम पाहायला मिळतेय. आराध्यासोबतचा फोटो पोस्ट करत बच्चन यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘चिमुकल्या आराध्याने तिचा हेअर बँड काढून आजोबांच्या केसात लावला. हे करत असताना तिचं हसूच आवरत नव्हतं.’ आपल्या आयुष्यातील अशा लहानमोठ्या पण, तितक्याच सुखद प्रसंगांना सर्वांसमोर आणत या महानायकाने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

सरत्या वर्षाला निरोप देत बिग बींनी एक ब्लॉगही लिहिला. ज्यात त्यांनी आजूबाजूचा माहोल, कुटुंबातील सदस्यांचा उत्साह आणि नवी सुरुवात या सर्व गोष्टींची सुरेख सांगड घातल्याचे पाहायला मिळाले.

VIDEO : केप टाऊनमध्ये अनुष्का फिरण्यात दंग, तर विराटवर चढला भांगड्याचा रंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 1:08 pm

Web Title: bollywood actor amitabh bachchan wishes a very happy new year and posts a cute photo with grand daughter aaradhya
Next Stories
1 VIDEO : केप टाऊनमध्ये अनुष्का फिरण्यात दंग, तर विराटवर चढला भांगड्याचा रंग
2 ड्रंक अँड ड्राइव्हविरोधी लढ्यात UP पोलिसांना चुलबूल पांडेची साथ
3 जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार हे धमाल सिनेमे
Just Now!
X