News Flash

लवकरच अनिल-माधुरी चाहत्यांची ‘धकधक’ वाढवणार?

पुन्हा एकदा अनिल कपूरसोबत तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता येणार आहे.

Anil Kapoor, Madhuri Dixit
अनिल कपूर, माधुरी दीक्षित

चित्रपटसृष्टीत काही कलाकार जोड्यांना प्रेक्षकांची इतकी पसंती मिळते की या जोड्यांचा प्रभाव वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर टिकून राहतो. अशीच एक जोडी म्हणजे माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची. माधुरी आणि अनिल यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण, गेल्या बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावर ते दोघंही एकत्र आलेले नाहीत. आता, याविषयी खंत करण्याची गरज नाही. कारण, येत्या काळात ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि ‘झक्कास अभिनेता’ अनिल कपूर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘डेक्कन क्रोनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिग्दर्शक इंद्र कुमारने ‘धमाल’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी माधुरीकडे विचारणा केली आहे. रोमॅन्टिक कॉमेडी प्रकारच्या या चित्रपटासाठी माधुरीने होकार दिला, तर पुन्हा एकदा अनिल कपूरसोबत तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता येणार आहे. ‘धमाल’, ‘डबल धमाल’नंतर आता ‘टोटल धमाल’ या चित्रपटाची तयारी सुरु करण्यात आली आहे. ‘टोटल धमाल’मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी हे कलाकार झळकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी आणि अनिल कपूर यांच्यासोबत चित्रपटाविषयी चर्चा सुरु असून, आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या निर्णयाकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

माधुरीने या चित्रपटासाठी होकार दिला तर २०१४ नंतर ती जवळपास तीन वर्षांच्या काळानंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यातही अनिल कपूरसोबत ती झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्येही त्याबद्दलची उत्सुकता लागून राहिली आहे. माधुरी आणि अनिल या दोघांनीही आतापर्यंत ‘राजा’, ‘राम-लखन’, ‘तेजाब’, ‘बेटा’, ‘पुकार’ या चित्रपटांमधअये एकत्र काम केले होते. त्यामुळे त्यांच्यासाठीसुद्धा तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणं एक वेगळाच अनुभव ठरेल यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2017 4:56 pm

Web Title: bollywood actor anil kapoor and actress madhuri dixit to romance once again on screen rumors
Next Stories
1 वरूण- नताशाचा ब्रेकअप?
2 ‘या’ अभिनेत्रीला रुपेरी पडद्यावर साकारायची आहे राधे माँची भूमिका’?
3 PHOTOS : शाहिद-मीराचा पहिला फोटोशूट
Just Now!
X