01 March 2021

News Flash

VIDEO : अनिल कपूर पुन्हा म्हणतोय, ‘माय नेम इज लखन’

फक्त अनिलच नव्हे तर माधुरी आणि सलमाननेही या परफॉर्मन्समध्ये त्याला साथ देत या गाण्यावर ठेका धरला. पाहा त्यांचा हा धमाल व्हिडिओ...

छाया सौजन्य- सोशल मीडिया

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर सध्या ‘रेस ३’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या साऱ्यामध्ये त्याला भाईजान सलमानचीही साथ मिळत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या कलाकारांनी नुकतीच ‘डांस दिवाने’ या रिअॅलिटी शोच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि माधुरी दीक्षित यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. ‘डांस दिवाने’च्या सेटवर या सर्व कलाकारा मंडळींनी फार धमाल केली. ज्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

९० च्या दशकात सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अनिल कपूर, सलमान खान आणि माधुरी दीक्षित या तिघांनीही यावेळी कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत धमाल केली. ज्यामध्ये एव्हरग्रीन अनिलने ‘वन टू का फोर’ या गाण्यावर ठेका धरत पुन्हा एकदा ‘माय नेम इज लखन’ असं म्हणत उपस्थितांना गतकाळाची आठवण करुन दिली.

फक्त अनिलच नव्हे तर माधुरी आणि सलमाननेही या परफॉर्मन्समध्ये त्याला साथ देत या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे आगामी चित्रपटाच्या निमित्ताने का असेना, पण या कलाकार मंडळींना पुन्हा एकाच स्टेजवर पाहण्याची सुरेख संधी प्रेक्षकांना मिळाली हे खरं.

वाचा : मेसेंजरपासून सुरु झालेल्या रिलेशनशिपमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीला गवसलं तिचं अस्तित्वं

कलाविश्वात सध्या सलमान खानची मुख्य भूमिका असणारा ‘रेस ३’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. या चित्रपटात सलमानसोबतच बॉबी देओल, डेझी शाह, अनिल कपूर, साकिब सलीम, अनिल कपूर हे चेहरेही झळकणार आहेत. तेव्हा आता इतकी तगडी स्टारकास्ट असऱ्या ‘रेस’ला बॉक्स ऑफिस कमाईच्या आकड्यांमध्ये मजल मारता येते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 1:47 pm

Web Title: bollywood actor anil kapoor dance with salman khan and actress madhuri dixit dance deewane race 3
Next Stories
1 ‘रेस ३’ चा मेकिंग व्हिडिओ पाहिलात का?
2 राज कपूर- नर्गिसच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा माहितीये?
3 माझ्या जन्माच्या आधीच आई गर्भपात करणार होती, भारती सिंगचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X