News Flash

अनिल कपूर यांनी पत्नीला दिली ‘ही’ महागडी कार गिफ्ट; किंमत आहे…

अनिल कपूर यांनी पत्नी सुनीताला दिली खास भेट

बॉलिवूडचा मिस्टर इंडिया अभिनेते अनिल कपूर त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. त्याचसोबत अनिल कपूर यांची लव्हस्टोरीदेखील खूप खास आहे. अनेकदा त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीच्या आठवणी सांगितल्या आहेत. जोपर्यंत पत्नी सुनीतासाठी आपण सर्व सुखसोयी तिच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
25 मार्चला अनिल कपूर यांच्या पत्नी सुनीता यांचा वाढदिवस होता. अनिल कपूर आणि त्यांच्या कुटुंबाने मोठ्या उत्साहात सुनीता यांचा वाढदिवस साजरा केला. सुनीता यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनिल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देणारी पोस्टही लिहली होती.

अनिल कपूर यांनी सुनीता यांना त्यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्ताने एक खास भेट दिली आहे. त्यांनी सुनीता यांना एक नवीकोरी मर्सेडिझ कार गिफ्ट केली आहे.

अनिल कपूर यांनी सुनीता यांना काळ्या रंगाची GLS मर्सेडीज कार वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे. या कारची किंमत एक कोटी रुपये आहे. अनिल कपूर यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या या शानदार गाडीचे फोटो सेलिब्रिटी फोटग्राफर्सनी टिपले आहेत. अनिल कपूर यांनी सुनीता यांना गिफ्ट केलेल्या मर्सेडीजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तर अनिल कपूर यांनी सुनीता यांच्यासाठी एक सुंदर पोस्ट लिहली होती. ” माझ्या आयुष्यातील माझ्या प्रेमासाठी.ट्रेनच्या तिसऱ्या डब्यातील प्रवासापासून लोकल बस, रिक्षा आणि काळ्या पिवळ्या टॅक्सीतील प्रवासापर्यंत, विमानाच्या इकोनॉमी सीटपासून बिझनेस क्लासच्या प्रवासापर्यंत, कराईकुडी गावातील कश्यातरी हॉटेलपासून लेहमधील तंबूत राहण्यापर्यंत, आपण चेहऱ्यावर आयम हसू ठेवून प्रेमाने हे सर्व एकत्र केलं आहे. अशा अनेक कारणांमधील ही काही कारणं आहेत ज्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करतो. ” अशी पोस्ट अनिल कपूर यांनी सुनीता यांच्या वाढदिवसानिमित्ताने लिहली होती. या पोस्टवर अनेक सिलिब्रिटींनी कमेंट करत सुनीता यांना शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 10:35 am

Web Title: bollywood actor anil kapoor gifted mercedes car to wife sunita on her birthday kpw 89
टॅग : Bollywood,Hindi Film
Next Stories
1 वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनुष्काने शेअर केला वामिकासोबतचा खास फोटो
2 “बिकनी अ‍ॅण्ड बिंदी”; प्रियांका चोप्राच्या फोटोचा सोशल मीडियावर धुमाकुळ
3 मिलिंद सोमणला करोनाची लागण; बॉलिवूडवर करोनाचं सावट
Just Now!
X