24 October 2020

News Flash

PHOTOS : आठवणी या अशाच असतात…, ओळखा पाहू या फोटोतील चेहरे

हल्ली एखाद्या सेलिब्रिटीचं लग्न असलं की माध्यमांचे प्रतिनिधी आणि फॅन पेजेसच्या माध्यमातून शक्य त्या सर्व परिंनी या लग्नसोहळ्याला चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यात येतं.

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो, Anupam Kher

स्मार्टफोच्या या दिवसांमध्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या गर्दीमध्ये काही गोष्टी मात्र कधीच बदलत नाहीत. या ‘काही गोष्टी’ म्हणजे अर्थातच आठवणी. हल्ली एखाद्या सेलिब्रिटीचं लग्न असलं की माध्यमांचे प्रतिनिधी आणि फॅन पेजेसच्या माध्यमातून शक्य त्या सर्व परिंनी या लग्नासोहळ्याला चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यात येतं. फक्त लग्नच नव्हे, तर सेलिब्रिटींच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांना अगदी जवळून पाहता, अनुभवता येतात. असं असलं तरीही ज्यावेळी सोशल मीडियाचं प्रस्थं नव्हतं तेव्हा नेमकं सेलिब्रिटींचे विवाहसोहळे आणि विविध कार्यक्रमांचे फोटो चाहत्यांपर्यंत येण्याचं साधन म्हणजे वृत्तपत्र किंवा एखाद्या सेलिब्रिटीकडेच संग्रही असणारा फोटोंचा एखादा अल्बम.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अशीच एक सुरेख आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफच्या लग्नातील हा फोटो असून, त्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही चेहरे पाहायला मिळत आहेत. जॅकी श्रॉफ आणि त्यांची पत्नी आएशा यांच्यासोबतच अभिनेत्री डिंपल कपाडिया, अनुपम खेर आणि सुपरस्टार रजनीकांतही या फोटोमध्ये दिसत आहेत.

Anupam Kher छाया सौजन्य- Anupam Kher / इन्स्टाग्राम

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

‘आठवणी या अशाच असतात. कृष्णधवल रंगांच्या सुरेख फोटोंमध्ये दडलेल्या. हा खरंच खूप खास फोटो आहे. ज्यामध्ये माझे कलाकार मित्र रजनीकांत, डिंपल कपाडियाही आहेत’, असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. सध्याच्या घडीला ही सर्व कलाकार मंडळी आपआपल्या क्षेत्रात व्यग्र असली तरीही अशा फोटोंच्या माध्यमातून तोंड वर काढणाऱ्या आठवणी त्यांना एकवटून ठेवतात असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 1:25 pm

Web Title: bollywood actor anupam kher shares a throwback photo from jackie shroffs wedding also seen is rajinikanth
Next Stories
1 Race 3 box office collection day 1 : …तरीही ‘रेस ३’ला मिळाली धमाकेदार बॉक्स ऑफिस कलेक्शनची ईदी
2 आलियाची बहीण म्हणते, आत्महत्या केली असती पण…
3 VIDEO : सुयश टिळकने दिलेलं आव्हान सिद्धार्थ चांदेकर स्वीकारणार का?
Just Now!
X