29 May 2020

News Flash

करिना-तैमूरच्या फोटोवर हिंदू मुस्लीम कमेंट करणाऱ्यावर भडकला अर्जून कपूर, म्हणाला तू कोण….

कमेंट वाचून अर्जूनचा चांगलाच संताप झाला

बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. मूळ शांत स्वभाव असणारा अर्जून अनेकदा सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करताना दिसला आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर त्याचा हा संताप पहायला मिळाला. झालं असं की, करिना कपूरने काही दिवसांपूर्वी तैमूरसोबतचा एका फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला नेटिझन्सकडून प्रचंड लाइक मिळाले होते. आठ लाखांहून अधिक जणांनी या फोटोला लाइक केलं होतं. अर्जून कपूरनेही या फोटोवर कमेंट करताना ‘द रिअल नवाब’ असं म्हटलं होतं.

पण एका नेटिझनने अर्जून कपूरच्या कमेंटवर नाराजी व्यक्त केली. त्याने आक्षेपार्ह शब्द वापरत बॉलिवूडमध्ये एक मुलगा हिंदूपासून मुस्लीम झाला आणि तुला चांगलं वाटत आहे अशी विचारणा केली.

 

View this post on Instagram

 

The only one I will ever allow to steal my frame…

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

ही कमेंट वाचून अर्जूनचा चांगलाच संताप झाला. त्याने अतिशय कठोर शब्दांत त्या व्यक्तीला सुनावलं. यावेळी त्याने आक्षेपार्ह शब्द वापरत लोक काय बोलतील याचा विचारही नाही केली. हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केल्याने अर्जून त्याच्यावर चांगलाच चिडला. अर्जूनने उत्तर देताना म्हटलं की, “अरे *** हिंदू असो किवा मुस्लीम काय फरक पडतो. त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला किंवा ज्यांना तो ओळखतो त्यापैकी कोणालाही याच्यामुळे फरक पडत नाही. तर मग हिंदू मुस्लीम करणारा तू कोण आहेस ?”

अर्जूनच्या या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. दरम्यान अर्जून कपूर लवकरच संदीप और पिंकी फरार या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. २० मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:18 am

Web Title: bollywood actor arjun kapoor gets angry over hindu muslim comment on kareena taimur photo sgy 87
Next Stories
1 ‘नेहमी आठ वाजता बोलतात आणि तयारीसाठी चार तासांचा वेळ देतात’; अनुराग कश्यपचा मोदींना टोला
2 ‘इतका मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते’; २१ दिवस लॉकडाउनला सेलिब्रिटींचा पाठिंबा
3 करोनामुळे विदेशात अडकली होती अभिनेत्री; घरी परतताच सांगितला ‘तो’ भयावह अनुभव
Just Now!
X