19 February 2018

News Flash

सेलिब्रिटींनीच उडवली अनुष्का, वरुणच्या लूकची खिल्ली

'सुई धागा' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: February 13, 2018 4:20 PM

सुई धागा

वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्या आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटासाठी दोन्ही कलाकारांनी त्यांच्यात बरेच बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. नेहमीच एक हॅण्डसम हंक म्हणून प्रेक्षकांच्या भेटाला येणारा वरुण धवन ‘सुई धागा’च्या निमित्ताने सर्वसामान्य कुटुंबातील एका मध्यमवयीन पुरुषाच्या भेटीला आला आहे. तर अनुष्का डिग्लॅम लूकमध्ये असूनही या साध्या रुपात प्रेक्षकांची मनं जिंकतेय.

सहसा एखाद्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला की त्याची प्रशंसा केली जाते आणि त्यासोबतच काही नेटकरी या सर्व गोष्टींची खिल्ली उडवण्यासाठीसुद्धा तयार असतातच. सुई धागाच्या बाबतीतही असंच काहीसं पाहायला मिळालं. पण, मुळात या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची खिल्ली उडवणाऱ्यांमध्ये काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. ते सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि आयुष्मान खुराना. अर्जुनने अनुष्काने पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करत लिहिलं ‘किती आनंदात दिसतेयस तू….’ अर्जुनच्या या कमेंटव्यतिरिक्त आयुष्मान खुरानानेही या फोटोवर विनोदी कमेंट केल्याचं पाहायला मिळालं.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

सेलिब्रिटींनीच ‘सुई धागा’च्या फर्स्ट लूकवर कमेंट केल्यामुळे सध्या कलाविश्वात हा चर्चेता विषय झाला आहे. ‘सुई धागा’मध्ये अनुष्का विणकराची (एम्ब्रॉयडरी करणारी स्त्री) तर वरुण शिंपीची (टेलर) भूमिका साकारत आहे. ‘मेक इन इंडिया’चा प्रचार चित्रपटातून करण्यात येणार आहे.

First Published on February 13, 2018 4:20 pm

Web Title: bollywood actor arjun kapoor pun on varun dhawan and anushka sharmas movie sui dhaaga
  1. No Comments.