बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगतीये ती म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या जोडीची. आपलं नातं सगळ्यांसमक्ष मान्य केल्यानंतर ही जोडी कायमच चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूर अनेकदा सोशल मीडियावर मलायकासाठी खास पोस्ट शेअर करत असतो. यामध्येच त्याने पुन्हा एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे अर्जुनने शेअर केलेल्या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनचीच जास्त चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे.
मलायकाच्या न कळत अर्जुनने तिचा फोटो कॅमेरात कैद केला आहे. यावेळी मलायकाला चेक आऊट करतोय, असं म्हटलं आहे. हा फोटो अर्जुनसोबतच मलायकानेदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
आणखी वाचा : हेल्मेट न घातल्यामुळे तापसीला भरावा लागला दंड
दरम्यान, अर्जुन कपूर लवकरच सैफ अली खानसोबत आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या या चित्रपटाचं धर्मशाला येथे चित्रीकण सुरु आहे. तर मलायका सध्या करीना आणि तैमूरसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2020 1:31 pm