News Flash

‘युनिसेफ’ने घेतली ‘परफेक्ट डॅडी’ची दखल

आझादला त्याने छायाचित्रकारांपासून बऱ्याचदा लांबच ठेवलं

छाया सौजन्य- ट्विटर

‘फादर्स डे’ आता दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच अभिनेता आमिर खान आणि त्याच्या मुलाचा एक सुरेख फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये आमिरच्या पत्नीने म्हणजेच किरण रावने आझादला उचलून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. फोटोमधील आमिरच्या चेहऱ्यावरील भाव पाहता आझादप्रती असणारं त्याचं प्रेम त्यातून व्यक्त होत. आपल्या मुलाचं बालपण म्हणजे बऱ्याच पालकांसाठी एक महत्त्वाचा ठेवा असतो. अनेकदा याच आठवणी जागवत पालक त्यात रंगून जातात. अगदी आमिरही आझादच्या बालपणीचा हा फोटो पोस्ट करुन त्यामध्ये रमल्याचं पाहायला मिळत आहे.

‘युनिसेफ’च्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये आमिरलाही टॅग करण्यात आलं आहे. हा फोटो पाहून अनेकांनीच आमिरचा उल्लेख एक परफेक्ट पिता म्हणून केला आहे. पडद्यावर त्याने जरी ‘हानिकारक बापू’ची भूमिका साकारली असली तरीही खऱ्या जीवनात मात्र एक वडील म्हणून आमिर अनेकांची मनं जिंकत आहे हे नाकारता येणार नाही. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या मुलांच्याच जास्त चर्चा पाहायला मिळत आहेत. याच सेलिब्रिटी किड्सच्या यादीत आझादच्या नावाचाही समावेश झाला आहे.

पाच वर्षांचा आझाद बऱ्याचदा किरण आणि आमिरसोबत काही कार्यक्रमांमध्येही जातो. आमिर, किरणच्या कुटुंबाचा त्रिकोण पूर्ण करणारा आझाद अनेकांचच लक्षही वेधतो. आपल्या व्यस्त वेळापत्रकातही आझादसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला किरण आणि आमिर प्राधान्य देतात. मुख्य म्हणजे सहसा त्याला छायाचित्रकार आणि प्रसारमाध्यमांपासूनही दूर ठेवलं जातं.

वाचा : जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…

आझादचा हा परफेक्ट डॅडी सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी माल्टाला रवाना झाला आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटामध्ये तो सध्या व्यस्त आहे. ‘ठग्स…’मध्ये आमिरसोबतच अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख, कतरिना कैफसुद्धा झळकणार आहेत.

वाचा : Father’s Day 2017: मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 6:44 pm

Web Title: bollywood actor dangal fame aamir khan super dad moment with son azad rao khan wife kiran family album unicef tweet see photo
Next Stories
1 आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता
2 अरुणभ कुमारचा ‘टीव्हीएफ’च्या सीईओपदाचा राजीनामा
3 अबू सालेमचा फक्त आवाज ऐकूनच प्रेमात पडली होती मोनिका
Just Now!
X