सोशल मीडियावर बरेच सेलिब्रिटी विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. मुख्य म्हणजे फक्त स्वत:चेच फोटो पोस्ट न करता काही रंजक गोष्टींविषयीचे फोटो आणि व्हिडिओही पोस्ट करण्याकडे बऱ्याच सेलिब्रिटींचा कल असतो. त्या सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे अभिनेता फरहान अख्तरचं. फरहानने सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो पाहून क्षणभरासाठी आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गाच्या प्रत्येक रुपाची अनेकांनाच भुरळ असते. त्याच रुपांमधील एक म्हणजे निसर्गाचं रौद्र रुप. याच रौद्र रुपाचा प्रत्यत काही वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं होतं. काही आठवतंय का….? हो अगदी बरोबर. इथे चर्चा सुरु आहे ती ढगफुटीची, ढगफुटी नेमकी कशी होते, हा प्रश्न अनेकांच्याच मनात घर करत असतो. ज्याचं उत्तर एका सुरेख व्हिडिओच्या माध्यमातून फरहानने दिलं आहे. पीटर मेअर या फोटोग्राफरने टीपलेल्या या टाइमलॅप्स व्हिडिओमध्ये ऑस्ट्रीयातील मिलस्टॅट तलावाजवळील परिसरात झालेल्या ढगफुटीचं दृश्य पाहायला मिळत आहे. आकाशातून पाण्याचे इतके मोठे लोट जमिनीच्या दिशेने पडताना पाहून क्षणार्घासाठी आपल्याला या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये.

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून, सध्या त्या फोटोग्राफरचीही बरीच चर्चा सुरु आहे. निसर्गाच्या प्रेमात असणाऱ्यांसाठी फरहानने हा व्हिडिओ पोस्ट करत त्याचा एक वेगळा आणि सहसा पाहायला न मिळणारा चेहराच दाखवला आहे, असंच म्हणावं लागेल.

Monsoon Trekking : ट्रेकिंगला जाताय, ‘या’ गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा

ढगफुटी म्हणजे नेमकं काय?
ढगफुटीच्यावेळी नेमके काय होते? या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? विज्ञानाने अर्थातच याचा शोध घेतला आहे. गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यात असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असं या ढगांचं नाव. हा एक लॅटिन शब्द आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे निम्बस म्हणजेच ढग. थोडक्यात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही या साऱ्याची सुरुवात असते.

ढगफुटीच्या वेळी आणखी एक अनोखी घटना घडते. मात्र त्याची मौज घेण्याचं भान कुणालाही नसतं. ढगफुटीच्या आधी हवामान अर्थातच पावसाळी असते. काळोखी दाटत जाते. पण, प्रत्यक्षात पाऊस पडताना काळोखाचे प्रमाण एकदम कमी होते. कधीकधी जणू सूर्यप्रकाशात पाऊस पडल्यासारखा भासतो. पावसाचे भलेमोठे थेंब हे याचे कारण आहे. हे थेंब आरशाप्रमाणे काम करतात आणि प्रकाश परावर्तित करीत राहतात. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रकाश दिसतो. थेंबाचा पृष्ठभाग वाढल्यामुळे नेहमीच्या थेंबापेक्षा चारपट अधिक प्रकाश ढगफुटीच्या थेंबातून परावर्तित होतो.
(ढफुटीची ही व्याख्या, लोकप्रभामध्ये प्रशांत दीक्षित यांनी लिहिलेल्या अंकात प्रसिद्ध झाली होती.)

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor farhan akhtar shares video of cloudburst and its jaw dropping
First published on: 20-06-2018 at 12:21 IST