19 October 2020

News Flash

गुलशन ग्रोवर यांना ‘बॅडमॅन’ हे नाव कसं पडलं माहितीये? मग जाणून घ्या कारण

...म्हणून गुलशन ग्रोवर बॅडमॅन या नावाने ओळखले जाऊ लागले

कलाविश्वातील बॅडमॅन या नावाने ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे गुलशन ग्रोवर . उत्तम अभिनयशैली आणि संवाद कौशल्य यांच्या जोरावर गुलशन ग्रोवर यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. १९८१ मध्ये रॉकी या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर अवघ्या काही काळातच त्यांनी बॅडमॅन ही नवीन ओळख मिळाली आणि आज ते याच नावाने खासकरुन ओळखले जातात.

गुलशन ग्रोवर यांनी आजवर ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे गुलशन यांनी ‘रॉकी’ चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले आणि पाहता पाहता ते बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

गुलशन यांच्या वाट्याला अनेक वेळा खलनायकाच्या भूमिका आल्याचं पाहायला मिळतं. मात्र या भूमिकांना त्यांनी पुरेपूर न्याय दिला. यामुळेच त्यांना बॉलिवूडमधील ‘बॅडमॅन’ हे नवं नावही मिळालं.

‘येस बॉस’, ‘मोहरा’, ‘राम लखन’, ‘राजा बाबू’, ‘सोहनी महिवाल’ यांसह अनेक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. त्यानंतर डिज्नीच्या जंगल बुकच्या सिक्वेलमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यामुळे आज ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, गुलशन ग्रोवर यांच्या ‘बॅडमॅन’ या नावावर आधारित चित्रपटाची निर्मिती देखील करण्यात आली असून या चित्रपटामध्ये त्यांनी नायकाची भूमिका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 10:11 am

Web Title: bollywood actor gulshan grover bedman ssj 93
Next Stories
1 ‘आज फार हतबल झालेय’; रेणुका शहाणेंची आशालता वाबगावकरांसाठी भावनिक पोस्ट
2 ड्रग्ज प्रकरण : तपासादरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही नाव आलं समोर
3 कंगनाचा पालिकेवर पुन्हा आरोप
Just Now!
X