News Flash

हृतिक ठरला जगातील सर्वात ‘हॅण्डसम’ अभिनेता, हॉलिवूड अभिनेत्यांवर केली मात

हृतिक त्याच्या अफलातून नृत्य कौशल्यासाठीही ओळखला जातो.

हृतिक रोशन

दरवर्षी बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये सर्नाधिक मानधन, सर्वाधिक मादक अभिनेता- अभिनेत्री, सामाजिक कार्यात हातभार लावणारे सेलिब्रिटी अशा विविध विभागांच्या यादी प्रसिद्ध केल्या जातात. अशाच एका यादीत बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने बाजी मारली आहे. बॉलिवूडमध्ये फक्त अभिनेत्रींच्याच सौदर्याचा गाजावाजा असतो असे नाही. तर, काही अभिनेत्यांच्या लूकवरही चाहत्यांची नजर खिळते. अशाच अभिनेत्यांमध्ये येणारे एक नाव म्हणजे हृतिक रोशन. ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिकच्या लूकची चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर जागतिक कलाविश्वातही झाल्याचे पाहायला मिळते आहे. कारण, worldstopmost.com ने प्रसिद्ध केलेल्या यादीवर नजर टाकली असता या यादीत हृतिक अग्रस्थानी असल्याचे लक्षात येते.

‘वर्ल्ड्स टॉप मोस्ट डॉट कॉम’च्या यादीत हृतिकचे नाव अग्रस्थानी असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावही करण्यात येतोय. हृतिकने सर्वाधिक सुंदर पुरुषांच्या यादीत रॉबर्ट पॅटिन्सन, क्रिस इवांस आणि टॉम हिडलस्टन या प्रसिद्ध अभिनेत्यांना मागे टाकले आहे. रुपेरी पडद्यावर विविध भूमिका साकारत तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा हृतिक त्याच्या अफलातून नृत्य कौशल्यासाठीही ओळखला जातो.

‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

हृतिक व्यतिरिक्त अभिनेता सलमान खानलाही या यादीत पाचवे स्थान मिळाले आहे. त्याशिवाय यादीत हेनरी कॅविल, नूह मिल्स या कलाकारांच्याही नावाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 12:41 pm

Web Title: bollywood actor hrithik roshan to become the most handsome actor in the world beats robert pattinson and tom hiddleston
Next Stories
1 शिल्पाच्या ‘मेटॅलिक साडी’ची चर्चा
2 तापसी पन्नूच्या ब्रेकअपची अफवा
3 ‘वयाच्या २० व्या वर्षापासूनच मासिक पाळीविषयी माहिती होती’
Just Now!
X