News Flash

कार्तिक आर्यनला करोनाची लागण; सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली माहिती

"माझ्यासाठी प्रार्थना करा"

मुंबईमध्ये करोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अद्याप करोनाचं संकट टळलेलं नाही. अभिनेता रणबीर कपूरनंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज बायपेयी अशा अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती. एकीकडे अनेक सेलिब्रिटी करोना प्रतिबंधात्मक लस घेत आहेत तर दुसरीकडे मात्र अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण होत चालली आहे.

बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यनला देखील आता करोनाची लागण झाली आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत स्वत: त्याच्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. कार्तिकने एक प्लसचं चिन्ह असलेला फोटो शेअर केला आहे. “पॉझेटिव्ह हो गया. दुवा करो” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

अनेक चाहत्यांनी कार्तिकला लवकर बरा हो असं कमेंटमध्ये म्हंटलं आहे. तसचं असेन सेलिब्रिटींनी देखील कार्तिकला “काळजी घे आणि लवकर बरा हो” असं म्हणत चिंता व्यक्त केलीय.

नुकताच कार्तिक अभिनेत्री कियारा अडवणीसोबत लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाला होता. नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या ‘भुलभुलैया-2’ मध्ये कार्तिक मुख्य भूमिकत झळकणार आहे. याच सिनेमाच्या शूटींगमध्ये तो गेल्या काही दिवसांपासून व्यस्त आहे. मात्र आता करोनाची लागण झाल्यानं कार्तिकला काम थांबवावं लागणार आहे.त्याचसोबत कार्तिकचा ‘धमाका’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर लवकरच रिलीज होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 4:44 pm

Web Title: bollywood actor kartik aaryan tested covid positive share post on instagram kpw 89
Next Stories
1 Birthday special: ‘थलायवी’साठी कंगनाचा कायापालट, वाढवलं 20 किलो वजन
2 सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा बोहल्यावर!; हिच्याशी बांधणार लग्नगाठ
3 बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच करणार दुसरे लग्न!
Just Now!
X