News Flash

मिलिंद सोमणला करोनाची लागण; बॉलिवूडवर करोनाचं सावट

होम क्वारंटीन असल्याची दिली माहिती

राज्यासह देशात करोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलं आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतेय. एकीकडे लसीकरण सुरु करण्यात आलं असलं तरी करोनाचा धोका वाढत असल्यानं नागरिकांनी पुन्हा एकदा सर्व नियमांचं पालन करावं अशा सुचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

तर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये देखील करोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसून येतंय. अनेक सेलिब्रिटींनंतर फिट आणि हिट असलेल्या अभिनेता मिलिंद सोमणला करोनाची लागण झाली आहे. मिलिंद सोमणने एक ट्विट करत याची माहिती दिली आहे. “पॉझिटिव्ह टेस्ट आली.” असं ट्विट त्याने केलंय. त्याचसोबत क्वारंटीन झाल्याचं देखील त्यानं सांगितलं आहे.

मिलिंज सोमणच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी त्याला ‘लवकर बरा हो’ म्हणत चिंता व्यक्त केली आहे. तर मिलिंदची पत्नी अंकिताने दोघांचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “इतर कशाचीही पर्वा नाही.” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.

मिलिंद सोमण सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. तसचं फिटनेसच्या बाबतीत मिलिंद पूर्ण काळजी घेतो. सोशल मीडियावर त्याचे प्रचंड चाहते आहेत. त्यामुळे मिलिंद सारख्या फिटनेस प्रेमी व्यक्तीलाही करोनाची लागण झाल्यानं चाहत्यांची चिंता वाढलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Konwar (@ankita_earthy)

गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली आहे. अभिनेता रणबीर सिंगनंतर, आमिर खान, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी यांना करोनाची लागण झालीय. तर 25 आर माधवन याच्या कुटुंबियानी त्याला करोनाची लागण झाल्याचं मीडियाला सांगितलं.

आधीच करोनाचं संकट आणि लॉकडाउनमुळे बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं असतानाच आता पुन्हा एकदा वाढत्या करोनाच्या संसर्गाने बी टाउनची चिंता पुन्हा वाढू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 8:43 am

Web Title: bollywood actor milind soman tests positive for covid 19 coronavirus kpw 89
Next Stories
1 कंगना राणावतला अटकपूर्व जामीन मंजूर
2 हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले
3 ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
Just Now!
X