17 October 2019

News Flash

नाना पाटेकर अखेर वर्षभरानंतर करणार कमबॅक

काला हा नानांचा शेवटचा चित्रपट होता

गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री तनूश्री दत्ताने नाना पाटेक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत #MeToo मोहिमेला सुरुवात केली होती. तनूश्रीने लावलेल्या आरोपांमुळे नाना पाटेकरांची ‘हाऊसफुल ४’ चित्रपटातून गच्छंती करण्यात आली होती. त्यानंतर बराच काळ नाना रुपेरी पडद्यापासून लांब होते.

आता चाहत्यांना खूश करण्यासाठी नाना पाटेकर एक नव्या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट एक तमिळ थ्रीलर असणार आहे. या चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नाना पाटेकरांनी चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी होकार कळवला असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘बेबी’ चित्रपटाचा तमिळ रिमेक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबत दाक्षिणात्य अभिनेता जयम रावीदेखील झकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आणखी वाचा : अन् बोल्ड सीन संपताच रेखांना कोसळलं रडू

नाना पाटेकरांचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘काला’ हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला होता. मात्र हिट ठरलेल्या या चित्रपटानंतर नाना बराच काळ चित्रपटसृष्टीपासूव लांब होते. आता पुन्हा एकदा तमिळ चित्रपटाच्या माध्यमातून नाना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

First Published on October 10, 2019 6:21 pm

Web Title: bollywood actor nana patekar going to play a role in tamil movie avb 95