News Flash

पंतप्रधानांचा आदर केलाच पाहिजे – नवाजुद्दीन सिद्दीकी

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी 'सेक्रेड गेम्स'मध्ये अक्षेपार्ह विधानं असल्यामुळे त्याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

नवाजुद्दीन सिद्दीकी, sacred games

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सध्याच्या घडीला तो चर्चेत आहे ते म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’ sacred games या वेब सीरिजमुळे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्या आलेल्या या वेब सीरिजमध्ये नवाजने गणेश गायतोंडे हे पात्र उभं केलं असून, त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली. पण, या वेब सीरिजने अनेकांचा रोषही ओढावला होता.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी ‘सेक्रेड गेम्स’मध्ये अक्षेपार्ह विधानं असल्यामुळे त्याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्याविषयीच नवाजला नुकताच एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी खुप काही बोललं जातं. पण सध्या भारतामध्ये मात्र यावरही काही मर्यादा आल्या आहेत, ज्याचा सामना कलाकारांना करावा लागतो, याविषयी तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न त्याला ‘टाईम्स नाऊ’च्या मुलाखतीत विचारण्यात आला.

यावेळी ‘सेक्रेड गेम्स’मधीलही त्याच्या भूमिकेचा संदर्भ देण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत नवाज म्हणाला, ‘ती एक वेब सीरिज होती आणि मी साकारलेली भूमिका ही एक प्रकारचं काल्पनिक पात्र होतं. मी फक्त त्यासाठी अभिनय केला होता. प्रत्येक गोष्टीत कलाकारांनी हस्तक्षेप करणं हे चुकीचं ठरेल किंबहुना ती माझी जबाबदारीच नाही. कारण, निर्माता- दिग्दर्शकांच्या विरोधात मी जाऊ शकत नाही. मी फक्त एक भूमिकाच साकारत होतो.’ मी जो अभिनय केला ती माझी खऱ्या आयुष्यातीलही भूमिका असेल असं नाही हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं. राजीव गांधी यांच्याविषयीच्या त्या वक्तव्याविषयी सांगत नवाज म्हणाला की, मी व्यक्तीगतपणे त्यांचा खुप जास्त आदर करतो. मुळात मी त्या पदाचा आदर करतो.

वाचा : Kerala Floods BLOG : ओणमच्या निमित्ताने साजरा होणार उत्सव माणुसकीचा, माणसातल्या देवाचा

आतापर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधानांचा आधर केलाच गेला पाहिजे. कारण, ते पद हे त्या आदरायोग्य आहे, ही महत्त्वाची बाब त्याने मांडली. या मुलाखतीत त्याने विविध विषयांवरही आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. सध्या त्याची ही मुलाखत बऱ्याच विषयांना वाचा फोडत आहे हे खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 2:08 pm

Web Title: bollywood actor nawazuddin siddiqui on sacred games and its controversy
Next Stories
1 जितेंद्र जोशीच्या ‘त्या’ पोस्टबाबत कुंडलकर म्हणतात…
2 ‘विरुष्का’चा विवाहसोहळा पाहून ‘या’ बॉलिवूड दिग्दर्शकाला रडूच कोसळलेलं
3 तुम्हाला नसलेलं सोयर सुतक आम्ही पाळलं, विजय चव्हाणांवरील कुंडलकरांच्या पोस्टला जितेंद्रचं सडेतोड उत्तर
Just Now!
X