दर्जेदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने कलाविश्वात आपला असा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सुरुवातीच्या काळात अगदी छोट्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने अल्पावधीतच कलाकारांच्या गर्दीत स्वत:ला सिद्ध केलं. कोणाचाही वरदहस्त नसताना त्याने यश संपादन केलं. असं असलं तरीही नवाजला त्याच्या आयुष्यात एका गोष्टीची फारत खंत वाटतेय.

काही महिन्यांपूर्वी नवाजने ‘अॅन ऑर्डिनरी लाइफ’ या चरित्रात्मक पुस्तकातून आपल्या आयुष्यातील कधीही न बोलल्या गेलेल्या प्रसंगावर भाष्य केलं. त्याने या पुस्तकातून आपल्या खासगी आयुष्यातील काही किस्सेसुद्धा सर्वांसमोर सांगितले. ज्यात त्याने अभिनेत्री निहारिका सिंगसोबतच्या आपल्या नातेसंबंधांकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. खासगी आयुष्याविषयी ‘त्या’ गोष्टी लिहिणं हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली असं त्याने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

VIDEO: धोनीचा संयम सुटला, मनिष पांडेबद्दल अपशब्द वापरला

‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, याविषयी सांगताना नवाज म्हणाला, “माझ्या आयुष्यातील संघर्षाच्या दिवसांविषयी मी खेरपणानं लिहिलं होतं. पण, त्यातही ‘त्या’ पाच पानांमध्ये उल्लेख केलेल्या गोष्टींची मला खंत आहे. कोणा एका व्यक्तीच्या नावानिशी मी सर्व गोष्टी उघड केल्या यात माझीच चूक होती. चरित्रात्मक पुस्कात मला दुसऱ्या महिलेच्या नावाचा उल्लेख करण्याची गरज नव्हती हे आता जाणवू लागलं आहे. मुळात ही सर्वात मोठी चुक आहे. मी निहारिकाचा आदर करतो. खरं सांगावं तर महिलांना आदराने वागवणं आणि नेहमी खरं बोलणं हे मी निहारिकाकडूनच शिकलो होतो.”

वाचा : प्रियाच्या व्हायरल गाण्याचे गीतकार आज करत आहेत जनरल स्टोअरमध्ये काम

https://www.instagram.com/p/Ba311Vzg3xj/

नवाजुद्दीन आणि निहारिका या दोघांनीही ‘मिस लव्हली’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. २०१२ मध्ये बी-टाऊनमध्ये पदार्पण करणाऱ्या निहारिकासोबतचं आपल्या नातेसंबंधांविषयी नवाजने त्या पुस्तकात उघडपणे लिहिलं होतं. पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी तो एका महिलेचा अपमान करत असून एका अर्थी तिचं शोषणच करत आहे, अशी टीकाही त्याच्यावर करण्यात आली होती.