12 December 2017

News Flash

‘फिल्मफेअर’ला नवाझुद्दिनकडून नोटीस

सात दिवसांत माफी मागा..

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 20, 2017 5:43 PM

नवाझुद्दिन सिद्दीकी

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाच्या जोरावर काही कलाकार मंडळी प्रेक्षकांवर चांगलीच पकड बनवून ठेवतात. अशाच काही अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे नवाझुद्दिन सिद्दीकी. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता सध्या एका मासिकावर चांगलाच नाराज असल्याचे म्हटले जात आहे. ‘फिल्मफेअर’ मासिकावर नवाझने चांगलीच आगपाखड केली असून, कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या मासिकामध्ये कोणा एका अज्ञात महिलेसोबत नवाझचा फोटो दाखवण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर नवाझुद्दिन या महिलेला डेट करत असल्याचेही मासिकात म्हणण्यात आले आहे. यामुळेच राग अनावर झालेल्या नवाझने फिल्मफेअर या प्रसिद्ध मासिकाला नोटीस पाठवली आहे.

८ मार्चला प्रसिद्ध झालेल्या फिल्मफेअर मासिकाच्या आवृत्तीत अनोळखी महिलेसोबत नवाझचे नाव जोडण्यात आल्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. या मासिकाला पाठवण्यात आलेल्या नोटिसीमध्ये असे म्हटले आहे की, ‘मासिकातील त्या लेखामुळे नवाझुद्दिनला मानसिक ताण, यातना आणि त्रासाला सामोरे जावे लागले होते.’ दरम्यान, नवाझ आणि त्याच्या पत्नीच्या नात्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा आल्याच्या अफवा त्याने धुडकावून लावल्या आहेत. झाल्याप्रकाराबद्दल सात दिवसांच्या आत फिल्मफेअर मासिकाने नवाझची माफी मागावी आणि तसे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नवाझुद्दिनच्या कायदेशीर चमूद्वारे करण्यात आली आहे.

नुकतीच १७ मार्चला नवाझुद्दिनच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली असून, त्याच्या भावाने ट्विटरद्वारे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. नवाझुद्दिननेही शुभेच्छांबद्दल आभार मानत एक ट्विट केले होते.

Back to Work…

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui) on

First Published on March 20, 2017 5:43 pm

Web Title: bollywood actor nawazuddin siddiqui sends legal notice to filmfare magazine for false article