25 September 2020

News Flash

फातिमासोबत पुन्हा आमिरची ‘दंगल’

परफेक्शनिस्ट आमिरने मोडला स्वत:चाच नियम

फातिमा सना शेख

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खानसोबत ‘दंगल’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेली नवोदित अभिनेत्री फातिमा सना शेख पुन्हा एकदा आमिरसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. पदार्पणातच एका प्रतिष्ठित बॅनर अंतर्गत साकारलेल्या चित्रपटातून झळकल्यानंतर फातिमाच्या वाट्याला आणखी एक मल्टीस्टारर चित्रपट आला आहे. ‘यशराज फिल्म्स’ या बॅनर अंतर्गत बनणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी फातिमाची निवड करण्यात आली आहे.

विजय कृष्ण आचार्य लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चन हे दोन ताकदीचे कलाकारही झळकणार असल्यामुळे फातिमाला या चित्रपटातून बरंच काही शिकायला मिळणार यात शंका नाही. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये फातिमाच्या भूमिकेसाठी इतरही काही अभिनेत्रींच्या नावांना प्राधान्य देण्यात आलं होतं. पण, सरतेशेवटी फातिमानेच यात बाजी मारली. तिच्या भूमिकेविषयी सांगताना विजय कृष्ण आचार्य म्हणाले, ‘चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने या भूमिकेसाठी अचूक अभिनेत्रीची निवड करण्याची गरज होती. बऱ्याच ऑडीशन्स आणि कार्यशाळांच्या सत्रांनंतर फातिमाची या लढवैय्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.’

‘दंगर्ल गर्ल्स’चा अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ पाहिला का?

‘दंगल गर्ल’ फातिमाआधी या भूमिकेसाठी आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, सारा खान आणि क्रिती सनॉन यांची नावंही समोर आली होती. पण, या चित्रपटातील फातिमाच्या लूक टेस्ट दरम्यानचा फोटो व्हायरल झाला आणि तिची या भूमिकेसाठी वर्णी लागण्याची शक्यताही तितकीच बळकट झाली. या चित्रपटाच्या निमित्ताने कधीही एकाच अभिनेत्रीसोबत पुन्हा चित्रपट न करणाऱ्या आमिरने स्वत:चाच नियम मोडला आहे. त्यामुळे बऱ्याच कारणांनी चर्चेत असणारा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावणार हे येत्या काळात कळेलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 7:22 pm

Web Title: bollywood actor perfectionist aamir khans dangal daughter fatima sana shaikh joins movie thugs of hindostan
Next Stories
1 जस्टिनसाठी किंग खान आणि सलमान पार्टीचं आयोजन करयायेत खरं, पण….
2 ‘कटप्पा’विरोधात खाटीक समाजाकडून गुन्हा दाखल
3 सनी लिओनीचे मराठीत पदार्पण
Just Now!
X