बॉलिवूड अभिनेता आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरविरोधात गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक बब्बरच्या कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोटार वाहन कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीकविरोधात वेगाने कार चालवून एका स्कुटरला धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


२१ वर्षाचा स्थानिक तरुण पाओलो कोरिया याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, ‘प्रतीक हे भरधाव वेगात गाडी चालवत होता. पोर्वोरीम पोलीस स्थानकाजवळील रस्त्यावर त्याने माझ्या दुचाकीला धडक दिली आणि मला व माझ्या बहिणीला धमकी दिली’ असं म्हटलं आहे. तर, प्रतीकनेही तरुणाविरोधात तक्रार दाखल केली असून त्याने कारची काच फोडल्याचा आरोप केला आहे.