प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये घेणारे बॉलिवूड कलाकार सतत महागड्या गाड्या आणि वस्तू वापरताना दिसतात. ज्याप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री लग्जरी ब्रँडच्या शौकीन असतात त्याच प्रमाणे अभिनेते महागड्या गाड्या खरेदी करताना दिसतात. नुकताच बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एक नवी बाइक अॅड केली आहे. या बाइकची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

राजकुमारने हार्ले डेविडसन फॅट बॉब ही नवी बाइक खरेदी केली आहे. हार्ले डेव्हिडसन बाइकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांनी राजकुमार रावचा नव्या बाइकसोबतचा फोटो शेअर करत अभिनंदन केले आहे. ‘राजकुमार रावचे हार्ले कुटुंबामध्ये स्वागत आहे आणि आम्हाला खात्री आहे की तु हार्ले डेविडसन फॅट बॉब बाइक राइड एन्जॉय करशील’ असे फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे. या बाइकची शोरुम किंमत १४ लाख ६९ हजार रुपये आहे. ही बाइक २०१७ मध्ये लॉन्च करण्यात आली होती.

हार्लेच्या फॅट बॉब बाइकच्या नव्या व्हर्जनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या बाइकमध्ये 1745 cc क्षमतेचे Milwaukee-Eight 107 इंजिन आहे. हे इंजिन 144Nm टॉर्क निर्माण करते. या बाइकचा ताशी वेग 180 Km आहे.

आणखी वाचा : कपिल शर्मा एक एपिसोडसाठी घेतो इतके कोटी, जाणून व्हाल थक्क!

काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निन्जा एच २ ही बाइक खरेदी केली. या बाइकची किंमत तब्बल २९ लाख रुपये असून ही बाइक खरेदी करणारा धोनी हा पहिला भारतीय ठरला आहे. धोनीने त्याच्या या बाइकसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.