16 February 2019

News Flash

रणबीर-आलियाच्या रिलेशनशिपविषयी महेश भट्ट काय म्हणाले ऐकलं का?

एका चित्रपटाच्या निमित्ताने आलिया आणि रणबीर एकत्र आले आणि त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीने अनेकांचं लक्ष वेधलं.

आलिया भट्ट, रणबीर कपूर, महेश भट्ट alia, ranbir, mahesh bhatt

यंदाच्या वर्षात बॉलिवूड सेलिब्रिटींवरही लग्नसराईचा जास्त प्रभाव पाहायला मिळत असल्याच्या चर्चा आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी जोड्या लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. त्यातच आता आणखी एका जोडीच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ती जोडी म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची.

अनपेक्षितपणे एका चित्रपटाच्या निमित्ताने आलिया आणि रणबीर एकत्र आले आणि त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीने अनेकांचं लक्ष वेधलं. डिनर डेट म्हणू नका किंवा मग आपल्या साथीदाराच्या वाट्याला येणारं यश म्हणू नका. प्रत्येक गोष्टीत आलिया आणि रणबीर एकमेकांची साथ देत असून माध्यमांपासूनही हे नातं लपवत नाही आहेत.

आता तर आलियाच्या वडिलांनी म्हणजेच चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांनीही या नात्याला हिरवा कंदील दाखवला आहे. नुकतंच महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी आलिया- रणबीरच्या नात्यावर त्यांचं मौन सोडलं आहे.

‘आलिया आणि रणबीर हे दोघंही आता मोठे झाले आहेत. समजुतदार झाले आहेत. त्यामुळे आपल्यासाठी काय योग्य आहे, याची निवड करण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. ते दोघं जर कोणताही निर्णय घेत आहेत तर त्यात माझी काहीच हरकत नसेल कारण, आलिया अगदी योग्य तेच पाऊल उचलेल यावर माझा विश्वास आहे’, असं ते म्हणाले.

पाहा : Mulk Trailer – हा देश मुस्लीमांचा आहे की नाही?, हाताळला महत्त्वाचा प्रश्न

आपल्यापर्यंत आलिया आणि रणबीरच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा पोहोचल्या आहेत. पण, त्या दोघांपैकी कोणीच त्याविषयीची माहिती आपल्याला दिलेली नाही. मुळात हे त्यांचं खासगी आयुष्य असल्यामुळे त्यात डोकावण्याचा मला काहीच अधिकार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकंदरच आलिया आणि रणबीरच्या कुटुंबियांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या नात्याचा पुढचा टप्पा नेमका काय असणार हे जाणून घेण्यासाठीच चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

First Published on July 10, 2018 1:50 pm

Web Title: bollywood actor ranbir kapoor and actress alia bhatt relationship mahesh bhatt speaks over this