बॉलिवूडचा रॉकस्टार अर्थात रणबीर कपूरने कलाविश्वामध्ये स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. रणबीर त्याचे चित्रपट आणि रिलेशनशीप या दोन कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला अभिनेता आहे. बॉलिवूडचा कॅसिनोव्हा असं विशेषण मिळविलेला रणबीर ‘संजू’ या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने नावारुपाला आला. या चित्रपटामुळे त्याची लोकप्रियता कमालीची वाढली. त्यामुळे सध्या त्याचा चाहत्यांची संख्या अफाट आहे. रणबीरची एक झलक दिसावी यासाठी चाहते प्रयत्न करत असतात. अशाच एका चाहत्याने काही दिवसांपूर्वी रणबीरची भेट घेतली. मात्र त्याच्या या भेटीनंतर रणबीरला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल व्हावं लागलं आहे.

सध्या सोशल मीडियावर रणबीर आणि त्याच्या चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा चाहता रणबीरचे पाय धरतांना तसंच त्याच्या पायाजवळ बसल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक स्तरांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रणबीरचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी आला होता. यावेळी चाहत्याने रणबीरसाठी एक खास भेटवस्तूही आणली होती. रणबीरला पाहिल्यानंतर या चाहत्याने रणबीरचे पाय पकडले,त्यानंतर त्याने रणबीरला भेटवस्तू दिली. ही भेटवस्तू स्वीकारल्यानंतर रणबीर सोफ्यावर बसून हे गिफ्ट उघडण्यास सुरुवात केली. तोपर्यंत हा चाहता रणबीरच्या पायाजवळच बसून होता. मात्र यादरम्यान, रणबीरने एकदाही या चाहत्याला आपल्या बाजूला सोफ्यावर बसण्यास सांगितलं नाही. त्यामुळे रणबीर चांगलाच ट्रोल झाला आहे.
हा रणबीर आहे की देव?, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे, ‘तर हा तुमचा चाहता आहे, तुमचा नोकर नाही. चाहता असून त्याला असं पायाजवळ बसविलं आहे’,असं अन्य एका युजरने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

Fan meet with #ranbirkapoor

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अनेकांनी आमिर, सलमान खान यांचं कौतुक करत रणबीरला खडेबोल सुनावले आहेत. तुम्ही कपूर आहात, कधीही खान होऊ शकत नाही. त्यासाठी मन मोठं असावं लागतं. दरम्यान, रणबीरच्या या वर्तणुकीनंतर त्याला अनेक टीकास्त्रांना सामोरं जावं लागलं आहे. सध्या रणबीर त्याच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट त्याच्यासोबकत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी विश्वनाथ मंदिराचं दर्शन घेतलं.यावेळचे फोटोही रणबीरने सोशल मीडियावर शेअर केले होते.