काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाविषयी बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. करिना कपूर, स्वरा भास्कर, सोनम कपूर आणि शिखा तल्सानिया यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं कथानक तरुणाईला आपलंसं वाटलं. पण त्यातही या चित्रपटातील एका दृश्यामुळे मात्र बऱ्याच चर्चा आणि वाद रंगले.

स्वरा भास्कर हिच्यावर चित्रीत या दृश्यामध्ये ती हस्तमैथुन करताना दिसत होती. याच एका दृश्यामुळे अनेकांनी स्वराला निशाण्यावर घेत तिच्यावर तीव्र शब्दांमध्ये टीका करण्यास सुरुवात केली. याच दृश्याविषयी अभिनेता रणबीर कपूरलाही एक प्रश्न विचारण्यात आला. ‘संजू’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने रणबीर एका कार्यक्रमात पोहोचला होता. तिथेच त्याला हा प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं उत्तर देत तो म्हणाला, ‘खरंच वीरे दी वेडिंगमध्ये असं कोणतं दृश्यं आहे? आता तर मला हा चित्रपट पाहायचाच आहे.’

वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ‘ही’ युक्ती

‘वीरे…’ मधील या दृश्याविषयी रणबीरचं हे वक्तव्य सर्वांनाच चर्चेसाठी एक नवा विषय देऊन गेली. मुळात खुद्द स्वरा भास्करनेही या दृश्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया अपेक्षितच होत्या अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे चित्रपटांच्या कथानकांमध्ये होणारे हे बदल काळानुरुप एक नवी क्रांतीच या कलाविश्वात घेऊन येत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.