पाकिस्तानमध्येही बॉलिवूड चित्रपटांची लोकप्रिय दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामध्ये आता अभिनेता रणबीर कपूरच्या ‘संजू’ या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. पाकिस्तानमध्ये रणबीरच्या ‘संजू’ या चित्रपटाला असा काही प्रसिसाद मिळत आहे, की ज्यामुळे चक्क दहशतवाद्यांनाच धडकी भरली आहे.

‘झी न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानी नागरिकांना हा चित्रपट न पाहण्याचा इशारा दिला आहे. मुख्य म्हणजे चित्रपट न पाहण्याचं भावनिक आव्हान करण्याचं हे तंत्र सध्या बरंच चर्चेत आलं आहे. मुख्य म्हणजे हे आव्हान करतेवेळी चित्रपटाच्या यशाला या संघटनांनी काश्मीर मुद्द्याशी जोडलं आहे. ‘संजू’ या चित्रपटाच्या वाट्याला पाकिस्तामध्ये मिळणाऱ्या यशाचा थेट परिणाम भारतात असणाऱ्या दहशतवाद्यांवर पडत असल्याचं त्या संघटनानी म्हटलं आहे.

वाचा : लोअर परळच्या चाळीतून ‘आशियाई’च्या मैदानात!

sanju

मंगळवारी रात्री एका आतंकवादी संघटनेतर्फे ट्विट करण्यात आलं होतं. भारतीय चित्रपटांच्या पाकिस्तानातील कमाईचे सर्व रुपये हे थेट भारतात पोहोचत असून, याच पैशांनी भारतीय सैन्यदलाकडून दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी शस्त्रात्रांची खरेदी करण्यात येते असं असं त्या संघटनांतर्फे म्हटलं जात आहे. त्यामुळे आता ‘संजू’च्या यशात हे एक वेगळंच वळण आलं आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. दरम्यान, कोट्यवधींची कमाई करत नव्या बॉक्स ऑफिस विक्रमांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘संजू’ या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये आतापर्यंत या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये १२.५८ कोटींची कमाई केली आहे.