01 March 2021

News Flash

आलियासाठी रणबीरची बहिणही ‘राजी’, भावाच्या गर्लफ्रेण्डला दिलं खास गिफ्ट

ते एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असून, त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीपूर्वी ऑफस्क्रीन केमिस्ट्रीच जास्त चर्चेत आली आहे.

आलिया, रणबीर, रिद्धीमा

झगमगत्या बॉलिवूड विश्वात सध्याच्या घडीला कोणत्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होत असेल, तर ती गोष्ट म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचं रिलेशनशिप. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून आलिया आणि रणबीर स्क्रीन शेअर करणार आहेत. पण, त्यापूर्वीच ते एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असून, त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीपूर्वी ऑफस्क्रीन केमिस्ट्रीच जास्त चर्चेत आली आहे.

रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करत असून, त्यांच्या रिलेशनशिपविषयी आता कुटुंबियांनाही माहिती झाली आहे, असं चित्र आहे. सुरुवातीला ऋषी कपूर यांचं ट्विट, त्यामागोमाग नीतू कपूर यांनी आलियाच्या फोटोवर केलेल्या कमेंट आणि आता रणबीरच्या बहिणीने म्हणजेच रिद्धीमाने तिच्यासाठी भेट स्वरुपात दिलेलं एक खास ब्रेसलेट या सर्व गोष्टी बरंच काही सांगून जात आहेत. रिद्धीमाने आलियाला एक सुरेख ब्रेसलेट गिफ्ट केलं आहे. ज्याबद्दल आलियाने इन्स्टा स्टोरिच्या माध्यमातून तिचे आभार मानले.

वाचा : Top 5 : ‘संजू’आधीही ‘या’ वास्तवदर्शी बायोपिकने जिंकलेली प्रेक्षकांची मनं

रणबीर आणि आलिया त्यांच्या या नात्याविषयी फार माहिती देत नसले तरीही एका मासिकाशी बोलताना रणबीरने त्यांच्या रिलेशनशिपविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या. आपल्या अफेअरच्या चर्चांना दुजोरा देत हे नातं अगदी नवं असून, त्याला आणखी वेळ देण्याची आणि ते नातं आणखी खुलून येण्याची गरज असल्याचं त्याने सांगितलं. तर आलियाने सोशल मीडियावर अपडेट केलेल्या स्टेटसमधील फोटोही या गोष्टींवर शिक्कामोर्तब करत आहे असंच म्हणावं लागेल. तेव्हा आता येत्या काळात हे बहुचर्चित सेलिब्रिटी कपल त्यांच्या नात्याला नेमकं कोणतं वळण देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 12:16 pm

Web Title: bollywood actor ranbir kapoors sister has a special gift for his alleged girlfriend alia bhatt see photo
Next Stories
1 कपड्यांवरुन ट्रोल करणा-यांना करिनाने दिले ‘असे’ प्रत्युत्तर!
2 VIDEO : ‘रणबीर वी लव्ह यू’ म्हणताच सोनमने का दिली अशी प्रतिक्रिया?
3 जान्हवीला पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहून श्रीदेवी म्हणाल्या होत्या…
Just Now!
X