News Flash

आली समीप घटिका, रणवीर- दीपिकाच्या लग्नाची तयारी सुरु?

लग्नाच्या खरेदीपासून ते त्यांच्या लग्नाच्या संपूर्ण रुपरेषेपर्यंतच्या चर्चांना उधाण

Ranveer, Deepika
रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग गेल्या बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने सुरु झालेल्या त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि बॉलिवूडच्या मोस्ट हॅपनिंग कपलच्या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं. असं हे सेलिब्रिटी जोडपं येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघंही श्रीलंकेला गेले होते, त्यावेळीच त्यांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण, खुद्द दीपिकानेच या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.

रणवीर आणि दीपिका या दोघांकडून त्यांच्या लग्नाविषयीची कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नसली तरीही लवकरच ते मुंबईत विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोशल मीडियावरही यासंबंधीच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा : प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

कलाविश्वातील सर्वात आवडतं सेलिब्रिटी कपल म्हणून चाहत्यांच्या मनावर आरुढ असणाऱ्या रणवीर- दीपिकाचं दाक्षिणात्य पद्धतीने लग्न होणार असून, त्यानंतर दिमाखदार रिसेप्शन पार पडेल असं म्हटलं जात आहे. या दोघांचेही कुटुंबीय सध्या या ग्रँड वेडिंगच्या तयारीला लागले असून येत्या काही दिवसांमध्येच त्याविषयीची माहिती समोर येईल असं वृत्तही काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केलं आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या खरेदीपासून ते त्यांच्या लग्नाच्या संपूर्ण रुपरेषेपर्यंतच्या बऱ्याच चर्चांना आता कलाविश्वात हवा मिळाली असून, सर्वांचंच लक्ष याविषयीच्या अधिकृत वृत्ताकडे लागून राहिलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2018 12:54 pm

Web Title: bollywood actor ranveer singh and actress deepika padukone to marry soon in mumbai wedding bells
Next Stories
1 फ्लॅशबॅक : हम आपके दिल मे रहते है…
2 आईच्या निधनानंतर जान्हवी पहिल्यांदाच कॅमेरासमोर
3 ‘इन्स्टा प्रोफाइल नव्हे, ही तर पॉर्न साइट’, शिबानी ट्रोलर्सच्या रडारवर
Just Now!
X